Aditya Thackeray: भाजपचेच खासदार संविधान विरोधात, त्यांच्या योजना म्हणजे...; आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर घणाघात
Maharshtra Politics: आदित्य ठाकरे जूचंद्र येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिले असता यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच संजय शिरसाट यांच्यावरही बोचरी टीका त्यांनी केली.
विरार : जनसुरक्षा विधेयकाबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, ते म्हणतात की डावी विचार सरणी, पण ज्या देशात 80 टक्के लोक राशन वर राहतात ते सरकार कोणत्या विचारसरणीचे आहे डावा की उजवा. ज्या योजना आपण काढतो त्या लेफ्टिंग केल्या जात आहेत.