Aditya Thackeray : हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच; बीकेसीत आदित्य ठाकरेंची गर्जना

Aditya Thackeray Criticize shinde fadnavis govt mumbai mva vajramuth sabha bkc Maharashtra politics news
Aditya Thackeray Criticize shinde fadnavis govt mumbai mva vajramuth sabha bkc Maharashtra politics news esakal

मुंबईतील बीकेसीत मैदानात आज (१ मे) मविआची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली , यावेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी शिंदे-फडणवीस यांचे सरकार हे कोसळणार म्हणजे कोसळणारच अशी गर्जना आदित्य ठाकरे यांनी केली. (Maharashtra Political News)

राज्याच्या मंत्रिमंडळात घटाबाह्य सरकार बसलं आहे, आणि मी लिहून देतो की हे थोड्या दिवसाचा खेळ आहे, सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. पण या सरकारमध्ये एकतरी महिली, मुंबईचा अस्सल मुंबईकर दिसला आहे का? कदाचित कोणीतरी स्केअर फूट विकणारे असतील पण इंच इंच जाणणारे कोणी नाहीयेत असे आदित्य ठाकरे म्हणाले. ना मुंबईचा, ना पुण्याचा आवाज आहे. मंत्रीमंडळ पाहिलं तर हे बिल्डर आणि कंत्राटदारांचं सरकार झालं आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray Criticize shinde fadnavis govt mumbai mva vajramuth sabha bkc Maharashtra politics news
Pune Crime News : इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल तर सावध व्हा! पुण्यात ज्येष्ठ महिलेला ५५ लाखांचा गंडा

महाविकास आघाडीच्या काळातजी कर्जमुक्ती झाली, कोविडच्या काळात अर्थचक्र बंद असताना देखील अनेक अपत्ती आल्या पण त्यावेळी साडे १४ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली. मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली पण शेतकऱ्यांचा आवाज ऐकणार कोणी या मंत्रिमंडळात नाहीये असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Aditya Thackeray Criticize shinde fadnavis govt mumbai mva vajramuth sabha bkc Maharashtra politics news
Crime News : निष्ठूरतेचा कळस! खायला घेऊन येतो सांगून गेलेले माय-बाप चार लेकरांना सोडून गायब

शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. आपल्याच महिलांविषयी बोलायचं झालं तर सुप्रिया सुळेंना शिवी देणारे मंत्री अजूनही बसलेले आहेत पण त्यांची हकालपट्टी झाली नाहीये. सुषमा अंधारेंबद्दल वेडं वाकडं बोलणारे गद्दार आमदार त्यांची हकालपट्टी झालेली नाहीये. या लोकांबद्दल कारवाई होत नसेल तर बाकीच्या महिलांनी आपेक्षा काय ठेवावी असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com