उद्धव ठाकरेंच्या धाकट्या मुलाचे पालींवर संशोधन

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय होऊन काम करत असतानाच त्यांचे धाकटे बंधू एका वेगळ्यच क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस यांचा रस वन्यप्राण्यांमध्ये आहे. नुकताच त्याने पालींच्या नवीन प्रजाती शोधल्या आहेत.   

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण ठाकरे नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आता ठाकरेंची नवी पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय होऊन काम करत असतानाच त्यांचे धाकटे बंधू एका वेगळ्यच क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस यांचा रस वन्यप्राण्यांमध्ये आहे. नुकताच त्याने पालींच्या नवीन प्रजाती शोधल्या आहेत.   

तेजस ठाकरे हे सध्या खेकडा प्रजातीवर संशोधन करत आहेत. नुकतेच, तेजस आणि त्यांच्या टीमने पालींच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या आहेत. कोयनेच्या खोऱ्यातून सापडलेल्या पालीच्या प्रजातीला ‘निपास्पिस कोयनाएन्सिस’ आणि आंबाघाटामधून सापडलेल्या प्रजातीला ‘निमास्पिस आंबा’ अशी नावं देण्यात आली आहेत.

तेजस ठाकरे, इशान अगरवाल आणि अक्षय खांडेकर या तिघांची टीम गेल्या वर्षी पावसाळ्यात संशोधनासाठी गेली होती. यावेळी त्यांनी पालींचे सॅम्पल गोळा करून त्यांच्या डीएनएचा अभ्यास केला. आमच्या टीमच्या या संशोधनाबद्दल मला आनंद होत असल्याचे तेजस यांनी म्हटले. दरम्यान, पालींच्या या नव्या प्रजातींच्या संदर्भातील संशोधन ‘झूटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झालं आहे.

महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व कलाक्षेत्र गाजवणाऱ्या ठाकरे घराण्यानं आता वन्यजीव क्षेत्रावरही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. यापूर्वी तेजस यांनी खेकड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावला असून हा खेकडा ‘ठाकरे’ यांच्याच नावानं ओळखला जात आहे. लाल-जांभळ्या व भगव्या रंगाच्या या खेकड्याला ‘ग्युबर्नेटोरियन ठाकरे’ असं नाव देण्यात आलं होतं. तेजस हे कला शाखेचे विद्यार्थी असून वन आणि वन्यजीवांच्या अभ्यासाची आवड आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray s brother Tejas Thackeray is researching on the lizard species