तीन हजार किलोमीटर अंतर कापून आलेल्या पक्षाचा राज्यात मृत्यू; बोरिवलीच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात सुरू होते उपचार

तुषार सोनवणे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

28 जुलैला हा पक्षी एका व्यक्तीला जखमी अवस्थेत आढळून आला. त्या व्यक्तीने तत्काळ याबाबत वनखात्याच्या अधिकाऱ्यांना कळवले.

मुंबई – 'सूटी' टर्न हा सुंदर पक्षी तुम्हाला माहितीये का? पूर्व अफ्रिकेतून हा पक्षी, हजारो किलोमीटरचं अंतर (आकाशातून) पार करून राज्यात आला.  तो आढळून आला ते तुंगारेश्वरच्या जंगला जवळ! परंतु याच भागात तो जखमी झाला आणि दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा त्याचा मृत्यू झाला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या पक्षाच्या पाठीवर जीपीएस आणि पायातही धातूची रिंग असल्याची माहिती समोर आली आहे.

नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक अत्याधुनिक मास्क; जो केवळ कोरोनाला रोखणार नाही तर मारेलही

आपल्या राज्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. समुद्राच्या जवळ अनेक छोटी मोठी जंगले आहेत. देशात विविध खंडांमधून ऋतूबदलाप्रमाणे विविध पक्षी येत असतात. तसेच राज्यातही असे पक्षी ऋतूबदलाप्रमाणे येत जात असतात.  अशीच एक विशेष पक्षांची प्रजाती म्हणजेच सूटी टर्न होय. अफ्रिका खंडाच्या पूर्वेला असलेल्या सेशल्स बेटावरून दरवर्षी हा पक्षी तळकोकणात येत असतो. या पक्षाचा राज्यात येण्याचा काळ साधारणतः ऑगस्ट ते सप्टेंबर हा आहे.

सेशल्स बेटांपासून ते तुंगारेश्वरच्या जंगलांपर्यंतचे अंतर सुमारे तीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक आहे. या तुंगारेश्वरच्या जंगलाजवळ स्थलांतर केल्यानंतर 28 जुलैला हा पक्षी एका व्यक्तीला जखमी अवस्थेत आढळून आला. त्या व्यक्तीने तत्काळ याबाबत वनखात्याच्या अधिकाऱ्यांना कळवले. जखमी अवस्थेतील या पक्षाला अधिकाऱ्यांनी बोरिवलीतील, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले, तेथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी त्यावर उपचार सुरू केले. उपचारासोबत पक्षाला खाद्य आणि ताजे मासे दिल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागली. परंतू तरीही 29 जूलैला हा पक्षी गतप्राण झाला.

सुशांत आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया सोबतंच महाराष्ट्र सरकारनेही सुप्रिम कोर्टात दाखल केली कैविएट - 

वेंगुर्ला रॉक्स हे बेट सिंधुदुर्गाच्या समुद्रात आहे. तेथे या पक्षाच्या प्रजननासाठी चांगला अधिवास आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात या पक्षाच्या आढळण्याच्या अनेक नोंदी आहेत.  परंतु सूटी टर्न या पक्षाने सेशेल्स ते मुंबई परिसरात केलेले हे स्थलांतराच पहिलेच असल्याचे जाणकार सांगतात. त्यामुळे हा पक्षी तर मृत पावला आहे. परंतु  पेंढा भरून हा पक्षी जतन करण्यता .येणार आहे.

तमन्ना भाटिया आणि विराट कोहली विरोधात कोर्टात याचिका दाखल, दोघांना अटक करण्याची मागणी 

पक्षाच्या पाठीवर जीपीएस टॅग कोणी लावले
या पक्षाने सेशेल्स बेटांपासून ते तुंगारेश्वरच्या जंगलापर्यंत केलेले स्थलांतर विशेष आहे. त्याच्या पाठीवर असलेल्या जीपीएसमुळे ही बाब समोर आली आहे. सेशेल्सच्या बेटांवर वाईल्डविंग बर्ड मॅनेजमेंट समूहाचे ख्रिस्तोफर फेअर व त्याच्या टीमने ऑगस्ट 2019 मध्ये 15 ‘सूटी टर्न’ पक्षांना सौर उर्जेवर चालणाऱ्या पॅनेलवर ईमेलची नोंद असलेला जीपीएस टॅग आणि  रिंग लावली होती. त्या 15 पक्षांमधीलच हा एक पक्षी होय.

---------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: african bird dies in mahrashtra during treatment