
पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.
मुंबईः अॅमेझॉनला दणका दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पश्चिम रेल्वेला इशारा दिला आहे. पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. याआधी मनसेनं अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट अॅपमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी केली होती.
पश्चिम रेल्वेतर्फे विविध माहिती पत्रके, जाहिराती प्रसिद्ध होत असतात. याव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातूनही माहिती देण्यात येते. मात्र सर्व पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात येत नाही. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेनं पश्चिम रेल्वेकडे मराठी अनिवार्य करण्याबद्दल मागणी केली आहे. प्रत्येक राज्यांनुसार केंद्र सरकारनं भाषाही वापरणं बंधनकारक केलं आहे. मात्र अस असतानाही मराठी भाषेचा वापर केला जात नाही, म्हणून मनसेनं यावर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा- लालबाग गॅस सिलिंडर दुर्घटना: आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या 9 वर
पश्चिम रेल्वेचा बहुंताश भाग मुंबईत येतो. तरी सुद्धा पश्चिम रेल्वेकडून स्थानिक भाषा मराठीचा वापर केलेला आढळून येत नाही. त्यामुळे मराठी भाषेचा वापर सुरु करावा यासाठी आग्रही आहे. याबाबतची दखल अजून घेतली नसून संबंधित अधिकारी मुजोरी करत असल्याचा आरोपही मनसेनं केला आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील याबाबत पश्चिम रेल्वेला पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअरही केलं आहे.
पश्चिम रेल्वेने माहिती पत्रके आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांची मागणी.@mnsadhikrut@WesternRly @Gmwrly @drmbct @srdombct pic.twitter.com/mFfr3SXbae
— महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना (@MNRKS_IR) December 26, 2020
पश्चिम रेल्वे विभागाने तातडीने या विषयाची गंभीर दखल घेऊन प्रसिद्ध होणारी पत्रकं, जाहिरातीमध्ये मराठी भाषेचा वापर बंधनकारक करावा अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.
After Amazon mns warns western railway marathi language advertisements