औरंगाबदनंतर नवी मुंबई विमानतळाच्या नावांवरून वाद पेटणार? 'स्व. दि. बा. पाटील' यांचे नाव देण्याची मनसेची मागणी

औरंगाबदनंतर नवी मुंबई विमानतळाच्या नावांवरून वाद पेटणार? 'स्व. दि. बा. पाटील' यांचे नाव देण्याची मनसेची मागणी

डोंबिवली - निवडणुकांचे बिगुल वाजण्याआधीच सर्वत्र राजकीय वातावरण रंगू लागले आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा राज्यात गाजत असतानाच नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरणावरुनही ठाणे जिल्ह्यातील राजकारण रंगू लागले आहे. आगरी कोळी समाजाचे लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानताळा देण्याची मागणी मनसेने केली असताना शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला दिले जावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यावरुन नावाचे केवळ राजकारण केले जात आहे, त्यांची इच्छा आहे का माहित नाही असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगत शिवसेनेच्या भूमिकेवर सवाल उठविला आहे. तर विमानतळाला नक्की कोणाचे नाव द्यावे यावरुन रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुखच संभ्रमावस्थेत असल्याचा टोला भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी लगाविला आहे. भाजपा आणि मनसेने नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले असून महाविकास आघाडी यावर कसा तोडगा काढते हे पहावे लागेल. 

औरंगाबाद पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन राजकीय कलगीतूरा सुरु आहे. त्यातच आगामी ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्याही निवडणूका असल्याने औरंगाबाद पाठोपाठ नवी मुंबई विमानतळ नामांतराच्या मुद्द्यावरुन ठाणे जिल्ह्यात राजकीय वादाला तोंड फुटले आहे. नवी मुंबईतील विमानतळ रायगड जिल्ह्यात उभे राहात असून या भूमिला प्रकल्पग्रस्त चळवळीचा इतिहास आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसाठी आपले आयुष्य वेचणारे लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी मनसेने केली होती. त्यानंतर शिवसेनेने या विमानतळाला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जावे अशी मागणी केली. ठाणे जिल्ह्यात लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आणि होऊ घातलेल्या तीन महानगरपालिका व दोन नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. भिवंडीचे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत असल्याने बाळासाहेबांच्या नावाला विरोध आहे का असा प्रश्न उपस्थित झाला होता. कल्याण पश्चिमेतील भाजप ठाणे व पालघर जिल्हा सचिव निलेश शेलार यांच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी भाजपाचे खासदार कपिल पाटील हे कल्याणमध्ये आले होते. त्यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी बाळासाहेबांविषयी सर्वांनाच आदर आहे. त्यांचे नाव द्यावे किंवा नाही हा केंद्र आणि राज्य सरकारचा विषय आहे. परंतू खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करुन शेतकऱ्यांना ज्यांनी नाव मिळवून दिला त्यांच्या नावाची मागणी ही विमानतळ उभारणीपासून स्थानिकांनी ही मागणी लावून धरली आहे. भूमिपूत्रांची मागणी रास्त असून यामुळे रायगडचे जिल्हाप्रमुखच संभ्रमावस्थेत असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. तर दुसरीकडे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनीही शिवसेनेला लक्ष करीत शिवसेना केवळ नावाचे राजकारण करीत असून त्यांची इच्छा आहे की नाही माहित नाही असा टोला लगाविला.

After Aurangabad, there will be a dispute over the names of Navi Mumbai Airport mns demand

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com