कोरोनाने सुखी कुटुंब संपवलं, पतीनंतर महिलेची मुलासह आत्महत्या

अंधेरीत इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारली
कोरोनाने सुखी कुटुंब संपवलं, पतीनंतर महिलेची मुलासह आत्महत्या

मुंबई: अंधेरी पूर्व (andheri) येथे राहणाऱ्या एका ४४ वर्षीय महिलेने सात वर्षाच्या मुलासोबत आत्महत्या (suicide) करुन जीवन संपवलं. तिने मुलाला घेऊन इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारली. सोमवारी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने 30 मे रोजी फेसबुकवर पोस्ट (fb post) अपलोड केली होती, त्यात कोविडमुळे त्यांच्या पतीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिस्थिती खालवल्याबाबत लिहिले होते. (After husbund death by covid women did suicide with son in andheri area)

चांदिवली येथील नहर अमृत रोडवरील तुलिपिया इमारतीत हा प्रकार घडला. रेश्मा त्रेंचिल(44) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्यासोबत गरूड(7) या त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यांचे मुंबईत कोणीही नातेवाईक नसून त्यांचा भाऊ अमेरीकेतून येणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुबिंयांना सुपूर्द करण्यात येतील असे अधिका-याने सांगितले.

कोरोनाने सुखी कुटुंब संपवलं, पतीनंतर महिलेची मुलासह आत्महत्या
मुंबई लसीकरण घोटाळा : जबाबदारी कोणाची? - हायकोर्ट

शरद मुलूकुट्ला (49) असे रेश्मा यांच्या पतीचे नाव होते. ते ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफोर्वर अॅग्रीकल्चरल कमोडिटी विभागात प्रमुख म्हणून काम करत होते. रेश्मा या गृहिणी होत्या. त्यांच्या पतीचे आई-वडील वाराणसीमध्ये राहतात. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार मिळावे म्हणून शरद हे वारणसीला गेले होते. पण दुर्दैवाने त्यांनाही कोविड झाला.

कोरोनाने सुखी कुटुंब संपवलं, पतीनंतर महिलेची मुलासह आत्महत्या
शिवसैनिकांनी दादागिरी केली तर आम्ही शांत बसणार नाही - प्रवीण दरेकर

चार आठवडे कोविडशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर रेश्मा यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यात पतीच्या अचानक झालेल्या निधनामुळे जीवन कसे बदलले आहे. हे त्यांनी मांडले. जीवनात कशा अडचणी आल्या आहेत, याबाबत त्यांनी लिहीले होते. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे त्यांनी याच कारणामुळे आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान रेश्मा यांच्या घरी अद्याप कोणतीही सुसाईड नोंट सापडलेली नाही. याप्रकरणी साकीनाका पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com