मोखाडा - मोखाडा तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडल्या नंतरही आरोग्य विभाग अजूनही झोपेतून जागे व्हायचे नाव घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मृत अर्भकास शववाहिका न मिळाल्याने त्यास पिशवीत घालून बसने प्रवास केल्याची घटना घडल्यानंतर पुन्हा एवढ्या मोठ्या घटनेतुन बचावलेल्या अविता कवर या मातेला घरी सोडण्यास रुग्णवाहिका न मिळाल्याने तिनेही त्याच परिस्थितीत बसने प्रवास केला केला आहे.