केईएमनंतर नायरमध्येही कोव्हिशील्डच्या चाचणीला सुरुवात

मिलिंद तांबे
Monday, 28 September 2020

स्वयंसेवकांना 1 कोटीचे वीमा संरक्षण

मुंबई,ता.28 : केईएम रुग्णालयात शनिवारी सुरू झालेील्या कोव्हीशिल्डच्या चाचणीनंतर आता नायर रुग्णालयातही चाचणीस सुरूवात करण्यात आली. नायरमध्ये देखील 3 स्वयंसेवकांना कोव्हीशिल्डची लस देण्यात आली असून आणखी 20 स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. 

केईएम रुग्णालयात दुसऱ्या टप्प्यातील कोव्हिशील्डच्या लसीचा शनिवारी प्रयोग सुरू झाला. यात तीन स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली.  त्यानंतर नायर रुग्णालयात 20 जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले असून त्यात 3 महिलांचा समावेश आहे. त्यातील  तिघांना सोमवारी कोव्हीशिल्डची लस देण्यात आली. तिन्ही स्वयंसेवक सुदृढ असून त्यांना कोणत्याही आजाराचा इतिहास नाही. स्क्रिनिंग दरम्यान त्यांच्या आरटी-पीसीआर आणि अँटीबॉडी चाचण्या ही करण्यात आल्याचे नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

सोमवारी तीन स्वयंसेवकांना पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर  त्या सर्वांना लसीकरणानंतर एक तासासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आणि नंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात आम्ही त्यांच्या सुरक्षेचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करू. यानंतर काही दुष्परिणाम दिसले तर त्याचीही माहिती घेण्यात येणार आहे. रुग्णालयाने प्रक्रियेसाठी आणखी 20 स्वयंसेवकांची स्क्रिनिंग केली आहे. त्यात 3 महिला आहेत. एकूण 100 जणांची टप्याटप्याने स्क्रिनिंग होणार असल्याची माहिती डॉ. भारमल यांनी दिली.

महत्त्वाची बातमी : मुंबई महापालिकेने कंगनाची केली पोलखोल, अवैध बांधकामाबाबत कोर्टात दिली महत्त्वाची माहिती

स्वयंसेवकांना एक कोटींचे वीमा संरक्षण

नायर आणि केईएम रुग्णालयाला चाचणीसाठी परवानगी मिळाल्यानंतर विमा सरंक्षण मिळण्यासाठी मुख्य रुग्णालयाचे संचालक असलेल्या डॉ. रमेश भारमल यांनी वारंवार आयसीएमआरशी संपर्क केला होता. शेवटी आयसीएमआरने स्वयंसेवकांना वीमा संरक्षण देण्याचा निर्णय़ घेतला. स्वयंसेवकाचा चाचणी दरम्यान मृत्यू झाल्यास  त्यांना एक कोटी रूपयांचे जीवन विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच, लसीकरणामुळे काही विपरीत परिणाम झाल्यास त्यांच्याकडे वैद्यकीय विमा 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
 

After Kem Hospital covishield testing starts in nair hopsital of mumbai too 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Kem Hospital covishield testing starts in nair hopsital of mumbai too