esakal | सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत घडामोडींचा वेग, गृहविभागात घडतायत 'या' घटना
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत घडामोडींचा वेग, गृहविभागात घडतायत 'या' घटना

सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा मुंबई पोलिसांविरोधात गेलाय. यानंतर अनिल देशमुख यांची प्रशासकीय वरिष्ठ पोलिस अधिकारी अभिदास गुप्ता आणि सीताराम कुंडे यांच्याशी यांच्याशी चर्चा होणार असल्याचं समजतंय.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत घडामोडींचा वेग, गृहविभागात घडतायत 'या' घटना

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत तपासणी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजे CBI कडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता मुंबईत मोठ्या हालचाली घडताना पाहायला मिळतायत. राज्यातील गृहमंत्रालयात या मोठ्या घडामोडी घडतायत. मुंबई पोलिसांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास आता CBI कडे सोपवायचाय. या निर्णयानंतर गृह मंत्रालयाच्या घडामोडींचा वेग आलाय. 

मिळालेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर गृह मंत्रालयाने महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावली आहे असं सूत्रांकडून समजतंय. गृह विभाग आता विधी आणि न्याय विभागाचा सल्ला घेणार असल्याचंही समजतंय. दरम्यान याप्रकरणी महाधिवक्ता यांच्याशीही चर्चा केली जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर गृहमंत्रालयात घडामोडींचा वेग आलाय.

मोठी बातमी - लॉकडाऊनच्या काळात 'या' आजारात  तब्बल ७० टक्के वाढ, सविस्तर वाचा

सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा मुंबई पोलिसांविरोधात गेलाय. यानंतर अनिल देशमुख यांची प्रशासकीय वरिष्ठ पोलिस अधिकारी अभिदास गुप्ता आणि सीताराम कुंडे यांच्याशी यांच्याशी चर्चा होणार असल्याचं समजतंय. महाधिवक्त्यांच्या मार्फत ही चर्चा केली जाईल. यामध्ये सुप्रीम कोर्टात झालेल्या वाद विवादावर चर्चा केली जाणार असल्याचं समजतंय. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार कोणती पावलं उचलणार याची चाचपणी आता केली जाणार असल्याचं समजतंय. याबाबतच्या बातम्या टीव्ही माध्यमांमधून समोर येतायत. 

पार्थ पवार म्हणतात 'सत्यमेव जायते' : 

मागच्या काही काळात महाराष्ट्राचं राजकारण सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे ढवळून निघालं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या प्रकरणी CBI ची मागणी करणाऱ्या अजित पवारांच्या सुपुत्रांनी, पार्थ पवार यांनी त्यांच्या भूमिकेवर बोलकं आज  ट्विट केलंय. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ट्विट करत 'सत्यमेव जयते' म्हटलंय. 

मोठी बातमी - गणेशोत्सवावर अस्मानी संकट, मुंबई ठाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

after supreme courts verdict on sushant singh rajput investigation anil deshmukh called important meeting