
मुंबई : दोन दिवसात घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळं आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंसमोरील आव्हान संपुष्टात आलं आहे. दरम्यान, भाजपनं आपल्या या निर्णयावर अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिली असून आम्ही महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. (After withdrawal of Andheri ByElection New program given by BJP to Murji Patel supporters)
शेलार म्हणाले, "भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करुन महाराष्ट्र हिताच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला आहे. पक्षाचा हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी मान्य असून त्यातील सगळे पैलू आता समोर आले आहेत. भाजपनं घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रथा-परंपरेला उच्च स्तरावर नेणारी आहे"
ऊर्जा राखून ठेवा
स्वतः भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी याबाबत भूमिका घेतली आहे. मी सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, पक्षानं निर्णय तर घेतलाच आहे, पण आपली ऊर्जा राखून ठेवा. दोन महिन्यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपण याचा सदुपयोग जरुर करुयात. हा निर्णय कळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकशाहीत भावना व्यक्त करणं गरजेचं आहे, पण स्थानांतर होऊ नये. भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण भान राखतील याची मला अपेक्षा आहे, असंही शेलार म्हणाले.
ठाकरे गटाचा विजय निश्चित! भाजपची माघार
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने अखेर माघार घेतली आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होत. त्यानंतर भाजपनं हा निर्णय घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.