चीनी वस्तुंवरील बहिष्काराच्या आंदोलनाची तीव्रता वाढवणार, सेलिब्रिटी, क्रिकेटपटुनी चिनी वस्तूंचे प्रमोशन न करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

लडाख भागातील भारत-चीन सीमेवर उडालेल्या  संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट)ने चिनी वस्तुंवर बहिष्काराच्या आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : लडाख भागातील भारत-चीन सीमेवर उडालेल्या  संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) ने चिनी वस्तुंवर बहिष्काराच्या आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कॉन्फेडरेशनचे पदाधिकारी ललित गांधी यांनी ही माहिती दिली. अभिनेते, क्रिकेटपटूनी चिनी उत्पादनाच्या जाहिराती करू नये आवाहनही संघटनेने केले आहे.

सोमवारी चीन-भारत सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाल्याने, देशभरात चीनविरुध्द तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सरकार व लष्कर त्यांच्या पध्दतीने चीनला उत्तर देईल. मात्र देशाचे जबाबदार नागरीक या नात्याने जनतेनेही चीनच्या दादागिरीला उत्तर द्यावे, असे आवाहन कॅट या संघटनेने केले आहे.

मोठी बातमी मुंबई पूर्व उपनगरामध्ये नागरिक सहन करतायेत 'हा' नाहक त्रास...

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे पदाधिकारी ललित गांधी यांनी याबद्दल आपलं मत मांडलं, पेटीएम, बिग बास्केट, स्विगी, फ्लिपकार्ट यांसारख्या भारतीय कंपन्यांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. भारतातील किरकोळ व्यापाराची बाजारपेठ काबीज करण्याचे चीनचे कारस्थान आहे. त्यामुळे सरकारने चीनी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर तात्काळ निर्बंध लागू करावेत, अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

बहिष्कारच्या नवीन वस्तुंची यादी जाहीर : 

चिनी वस्तुंवरील बहिष्काराचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय संघटनेने घेतला. संघटनेने बहिष्कारच्या नवीन वस्तुंची यादी जाहीर केली आहे. भारतीय अभिनेते व क्रिकेटपटूंनी चिनी वस्तुंच्या जाहीराती करू नयेत, असेही आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

agitation against chinese product to become more aggressive in mumbai

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation against chinese product to become more aggressive in mumbai