''महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग लढा'' देशाच्या इतिहासातील दुर्मिळ उदाहरण - शरद पवार

तुषार सोनवणे
Wednesday, 27 January 2021

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या पुस्तक प्रकाशन समारंभावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते.

मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या डॉ. दीपक कमल तानाजी पवार संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, छगन भुजबळ, सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

पुस्तक प्रकाशन समारंभावेळी बोलतांना शरद पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष लढ्यात आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कसे योगदान दिले त्याची आठवण करून दिली. ''त्यावेळी केंद्र सरकारने महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागाची केलेली मांडणी महाराष्ट्राला मान्य नव्हती. त्यामुळे महाराष्ट्राने लढा देण्याचे ठरवले. तर तत्कालीन काही घटक महाराष्ट्र भांडखोर आहे असं चित्र उभं करीत होते. परंतु त्यांमध्ये महाराष्ट्राची बाजू सक्षमपणे मांडण्याऱ्यांमध्ये बॅ अंतुले यांचं नाव आघाडीवर होतं.  सीमाभाग महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात अंतुले यांचं योगदान मोठं होतं''. असं पवार यांनी यावेळी म्हटलं.

तसंच राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी या आंदोलनासाठी काय काय योगदान दिले? याचा धावता उल्लेख पवार यांनी केली. त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांनी गनिमी काव्यांने बेळगाव येथील आंदोलनात लावलेल्या हजेरीचाही किस्साही सांगितला.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

''दीपक पवार यांच्या या पुस्तकाच्या माध्यमांतून महाराष्ट्राने आतापर्यंत दिलेल्या लढ्याचा इतिहास सर्वांसमोर येणार आहे. त्यासाठी त्यांनी सर्व महत्वाचे ऐतिहासिक दस्ताऐवजांवर संशोधन केले आहे. इतके वर्ष एखादा लढा शांततामय मार्गाने चालणं, हे देशातील दुर्मिळ उदाहरण ठरेल. आजही सीमाभागातील लोक आणि महाराष्ट्रातील कार्यकर्ते, राजकीय नेते लढा देत आहेत. त्यांच्या लढ्यात आपण सहभागी आहोत. राज्यातील सर्वपक्षिय नेते मराठीच्या मुद्यावर एक आहेत. हे यानिमिताने स्पष्ट होत आहे''. असेही पवार यावेळी म्हणाले. भाषणाच्या शेवटी त्यांनी पुस्तकाचे लेखक श्री दीपक पवार यांचे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.

agitation on the Maharashtra-Karnataka simavad for so many years in a peaceful way said Sharad Pawar

-----------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation on the Maharashtra-Karnataka simavad for so many years in a peaceful way said Sharad Pawar