सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच, एम्सने CBI कडे पाठवला अहवाल

सुमित बागुल
Saturday, 3 October 2020

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच आहे हे आता स्पष्ट झालंय. याला पार्श्वभूमी आहे एम्सच्या अहवालाची. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केलेली आहे, सुशांतची हत्या झालेली नाही असा अहवाल एम्सने CBI दिलाय. एम्सच्या अहवालानंतर आता कूपर रुग्णालयाचा रिपोर्टही योग्य असल्याचं स्पष्ट होतंय. 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात राजकारण झालं, आरोप प्रत्यारोप झालेत. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. तपासाची केस सुप्रीम कोर्टात गेली. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून तपास काढून CBI कडे सोपवण्यात आला. त्यानंतर आता एम्सच्या अहवालावरून जी माहिती समोर येतेय त्यामध्ये सुशांतची आत्महत्याच असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतची  हत्या झाल्याचा आरोप करणारे तोंडावर पडलेत असं म्हंटल तर वावगं ठरू नये

महत्त्वाची बातमी : बाबरी पतनाआधी माधव गोडबोलेंनी आमच्या कानावर काही गोष्टी घातल्या होत्या, पण त्यांचं मत मागे पडलं? कारण सांगितलं शरद पवारांनी

सुशांतच्या मृत्यूनंतर जेंव्हा प्रकरण CBI कडे चौकशीला गेलं तेंव्हा आता सुशांतला न्याय मिळेल असं अनेकांना वाटत होतं कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पॅनलला देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात होतं. केवळ एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारवर आणि मुंबई पोलिसांवर त्यांच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले. मात्र आता एमच्या डॉक्टरांच्या पॅनलकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी हत्या नसून आत्महत्या असल्याचं स्पष्ट होतंय.   

सुशांत सिंह मृत्यूचा तपास CBI करतेय. आता एमच्या या अहवालनानंतर आता CBI काय भूमिका घेतेय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. 

aiims send report about sushant sing rajput death case to CBI stating it was suicide and not murder


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aiims send report about sushant sing rajput death case to CBI stating it was suicide and not murder