खारघर : खारघर शहरात गेल्या काही दिवसांत वायुप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आहे. बुधवारी (ता. ३१) हवेची गुणवत्ता निर्देशांक तब्बल ४२० पर्यंत पोहोचल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. .हवेची गुणवत्ता ० ते ५० दरम्यान चांगली मानले जात असताना ३०० पेक्षा जास्त हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक श्रेणीत येते. त्यामुळे खारघरमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणवाढीची प्रमुख कारणे म्हणून सतत सुरू असलेली बांधकामे, मोठ्या प्रमाणावरील वाहनांची वर्दळ, रस्त्यांवरील धूळ, तसेच औद्योगिक परिसरातून होणारे उत्सर्जन यांचा उल्लेख नागरिकांकडून केला जात आहे. सकाळ-संध्याकाळ धुक्यासारखी धूळ हवेत पसरलेली दिसते. परिणामी, श्वास घेणेही कठीण होत आहे..राजकीय गोंधळाचा कळस! निवडणुकीत कोणी कोणासोबत युती केली? कोणते पक्ष कुठे आमनेसामने? वाचा 29 महानगरपालिकांचे सत्तासमीकरण.दरम्यान, पर्यावरणप्रेमी आणि रहिवासी संघटनांनी प्रशासनाकडे तातडीने बांधकामस्थळांवर धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी, रस्त्यांची नियमित स्वच्छता, प्रदूषणकारी वाहनांवर कारवाई आणि हरित क्षेत्र वाढवणे, या उपायांची अंमलबजावणी तत्काळ करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे..अनेकांना त्रासविशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दमा व हृदयरोग असलेले रुग्ण यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी सेंट्रल पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका नागरिकाने एका वेबसाईटवर गुणवत्तेची पाहणी केली असता, हवेची गुणवत्ता निर्देशांक तब्बल ४२० पर्यंत पोहोचल्याचे सोशल मीडियावर व्हायरल केली. .Mumbai News: नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं, मुंबईतील 'सिद्धिविनायक'सह अनेक मंदिरांत भाविकांसाठी विशेष सोय.वाढत्या प्रदूषणाची गुणवत्ता पाहून नागरिकांमध्ये पालिका आणि प्रदूषण महामंडळाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ, घशात खवखव, श्वासोच्छवासात अडचण, डोकेदुखीचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले..खारघरमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात चुकीच्या वेबसाईटवरून माहिती प्रसारित करण्यात आली आहे. खारघर परिसरात हवेच्या गुणवत्तेची माहिती घेतली असता चांगली असून निर्देशांक ११५ पर्यंत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.- विक्रांत भालेराव, क्षेत्रीय अधिकारी, तळोजा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.