Pollution in Mumbai | मुंबईत पुन्हा हवेची गुणवत्ता खालावली; धुरक्‍यामुळे त्रास; हृदयरोग्यांसाठी धोक्‍याचा इशारा 

भाग्यश्री भुवड
Friday, 8 January 2021

मुंबईत आजही हवेची गुणवत्ता खालावली होती. सकाळपासून धुरक्‍यांचा त्रास जाणवत होता. आकाशात दाटून आलेले ढग आणि जमा झालेल्या धूलिकणांमुळे नागरिकांना आरोग्याच्या प्रश्‍न गंभीर झाला आहे.

मुंबई  : मुंबईत आजही हवेची गुणवत्ता खालावली होती. सकाळपासून धुरक्‍यांचा त्रास जाणवत होता. आकाशात दाटून आलेले ढग आणि जमा झालेल्या धूलिकणांमुळे नागरिकांना आरोग्याच्या प्रश्‍न गंभीर झाला आहे. मुंबई शहराचा एक्‍यूआय 317 नोंदवण्यात आला, तर हवा अतिशय वाईट दर्जाची नोंदवण्यात आली. 

 

मुंबई या संपूर्ण शहराची हवा अतिशय वाईट असल्याची नोंद सफर प्रणालीने केली आहे. शहरातील बीकेसी म्हणजेच वांद्रे-संकुल परिसरात गेल्या सात दिवसांपासून हवा अतिशय वाईट दर्जाची आहे. या परिसरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 346 ऐक्‍यूआय (एअर क्वॉलिटी इंडेक्‍स) आणि पीएम 2.5 एवढा नोंदवण्यात आला. भांडुपमध्ये मध्यम दर्जाची हवा होती. एक्‍यूआय 169 एवढा हवेचा निर्देशांक होता. कुलाब्यात अतिशय वाईट स्वरूपाची हवा नोंदवली असून, 352 एक्‍यूआय हवेचा निर्देशांक नोंद करण्यात आला. माझगाव, अंधेरी परिसरात अतिशय वाईट दर्जाची हवा असून, अनुक्रमे 316, 303 एक्‍यूआय एवढा नोंदवण्यात आला. वरळी, बोरिवली, चेंबूरमध्ये अनुक्रमे 208, 322, 305 असा एक्‍यूआय हवेचा निर्देशांक नोंद करण्यात आला. नवी मुंबईत अतिशय वाईट स्वरूपाची हवा नोंद करण्यात आली असून, 310 एक्‍यूआय एवढा निर्देशांक नोंद करण्यात आला. 

मुंबई,  ठाणे, नवी मुंबई परिसरातील बातम्यांसाठी येथे ्क्लिक करा

ठाणे, नवी मुंबईची हवा अतिवाईट 
मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, नवी मुंबईतील हवेचा दर्जा अतिवाईट स्तरावर पोहचला असल्यामुळे शहरातील श्‍वसनविकार तसेच हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. अरबी समुद्रात आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सफर संस्थेच्या अहवालानुसार हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या आठ केंद्रांपैकी पाच केंद्रावर अतिवाईट म्हणजेच अतिप्रदूषित नोंदविण्यात आले आहे. 
 

 

मुंबई व दिल्लीत वायुप्रदूषण वाढत आहे; परंतु आपल्याकडे या वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांची गंभीरता नाही. प्रदूषित हवेत चालणारे नागरिक फुप्फुसापेक्षा हृदयविकारांचे मोठ्या प्रमाणात बळी ठरतात. हवेतील प्रदूषके शरीरात सुपरऑक्‍सिडाईज्ड रेणूची वाढ करतात व ते शरीरपेशीचा विध्वंस करतात. त्यामुळे फुप्फुसांना सूज येते आणि त्याहीपेक्षा रक्तवाहिन्या व हृदयाला इजा पोहचते. 
- डॉ. संजय तारळेकर,

हृदय शल्यविशारद 

Air quality in Mumbai deteriorated again Trouble due to smoke Danger warning for heart patients

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air quality in Mumbai deteriorated again Trouble due to smoke Danger warning for heart patients