राज्याचे मुख्य सचिव म्हणून अजोय महेता यांची गरज! पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 मार्च 2020

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी अजोय महेता यांना मिळालेल्या मुदतवाढीत करोनासंकटाचे सावट लक्षात घेता पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी अजोय महेता यांना मिळालेल्या मुदतवाढीत करोनासंकटाचे सावट लक्षात घेता पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक बाधित राज्यांपैकी एक आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढू नये याची काटेकोर काळजी घेणे आवश्यक आहे. अजोय महेता हे अत्यंत कुशलतेने महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा समन्वय साधत शक्य त्या सर्व उपाययोजना अंमलात आणत आहेत.

 

संकटकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नवा अधिकारी नेमण्याऐवजी कुशल प्रशासक अधिकारपदावर असणे आवश्यक आहे. त्यासाठी महेता यांनाच मुदतवाढ मिळणे लाभदायक असेल असे राज्य सरकारचे मत आहे. मुदतवाढीसंबंधीचा पत्रव्यवहार कोरोनासंकटाअगोदर करण्यात आला होता. पंतप्रधान कार्यालयही महेता यांच्या कामावर खूष आहेत. राज्याच्या मुख्य सचिवपदावरील व्यक्तीला सतत मुदतवाढ देणे नियमाला धरून नसल्याने आता महेता निवृत्त होण्याची शक्यता होती. “कोरोना”मुळे परिस्थिती बदलली असे मानले जाते. या संबंधीचा निरोप लवकरच अधिकृतपणे मिळेल काय याकडे लक्ष लागले आहे.

Ajay Mehta needs as Chief Secretary of State! Possibility of recurrence

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajay Mehta needs as Chief Secretary of State! Possibility of recurrence