esakal | अवघ्या दोन तासात 'सारथी'ला पाठवला 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये निधी; अजितदादांची घोषणाच नाही, थेट कार्यवाही
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या दोन तासात 'सारथी'ला पाठवला 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये निधी; अजितदादांची घोषणाच नाही, थेट कार्यवाही

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातच सदर निधी उपलब्ध करुन देण्यात आला

अवघ्या दोन तासात 'सारथी'ला पाठवला 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये निधी; अजितदादांची घोषणाच नाही, थेट कार्यवाही

sakal_logo
By
संजय मिस्कीन

मुंबई :  मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला 8 कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासातच सदर निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून तसे पत्र ‘सारथी’ संस्थेला पाठवण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णयक्षमता व झपाट्याने काम करण्यासाठी ओळखले जातात. यानिमित्ताने ते पुन्हा सिद्ध झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी 11 वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. दुपारी दिड वाजता पत्रकार परिषदेत 8 कोटी देत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने पत्र क्र.संकिर्ण 2019/प्र.क्र.117/महामंडळे, दि. 9 जुलै 2020 निर्गमित करण्यात आले असून त्याद्वारे सुमारे 7 कोटी 94 लाख 89 हजार 238 रुपये इतका निधी ‘सारथी’ संस्थेला तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

BIG NEWS - सिप्ला कंपनीने आणलं जगातील सर्वात स्वस्त रेमेडेसीविर जेनेरिक औषध! जाणून घ्या किंमत

बैठकीतले 'की' पॉईंट्स 

  • सारथी संस्थेची स्वायत्तता टिकवणार
  • वडेट्टीवार यांच्या खात्यातून सारथी संस्थेला उद्याच्या उद्या 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार 
  • सारथी संस्था स्थापन झाल्यापासून जे प्रश्न निर्माण झाले त्यासाठी सीताराम कुंटे यांनी आपला अहवाल 14 दिवसात द्यावा 
  • मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला विनंती करणार की सारथी नियोजन विभागाच्या अंतर्गत आणावं सोबतच अण्णासाहेब पाटील महामंडळ नियोजन विभागात आणणार
  • मराठा समाजातल्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणारच 

संपादन - सुमित बागुल 

ajit pawar funds worth 7 crore 94 lac 89 thousand 238 rupees transferred to sarathi organisation in two hours