esakal | मराठा आरक्षणावरून अजित पवार विरोधकांवर कडाडले; गैरसमज पसरवत असल्याचा केला आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा आरक्षणावरून अजित पवार विरोधकांवर कडाडले; गैरसमज पसरवत असल्याचा केला आरोप

मराठा आरक्षणावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांच्या टीकेला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. 

मराठा आरक्षणावरून अजित पवार विरोधकांवर कडाडले; गैरसमज पसरवत असल्याचा केला आरोप

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - राज्यविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. मराठा आरक्षणावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांच्या टीकेला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. 

मराठा आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की, 'राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आधीच्या सरकारने दिले त्यापेक्षा अधिक वकील राज्य सरकारने दिले आहेत. आता त्यातही कोणाला राजकारण करायचं असेल गैरसमज पसरवायचे असतील तर, त्यांना कोणी थांबवू शकत नाही. दरम्यान, अधिवेशनाआधी सभागृहाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाकडून मराठा आरक्षणाला गांभीर्याने न घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', अशा घोषणा देण्यात आल्या.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेतच ओबीसीबद्दलचे प्रश्न असतील किंवा मराठा समाजासंबंधी आरक्षणाचे प्रश्न असतील, कोणालाही धक्का न लावता हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. तारीख पुढे ढकलली आहे हे सर्वांना माहिती आहे. तारखेच्या वेळी चांगले वकील देण्याचं काम राज्य सरकार करत आहे' असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. 'प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना राज्य सरकारला कोणी प्रश्न विचारु शकतं का? आरक्षणाचा मुद्दा सोडून बाकीच्या प्रश्नांवर सरकार कधीही चर्चा करण्यास तयार आहे. मुख्यमंत्री, अशोक चव्हाण अशा काही मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वत: बाहेर येऊन चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं होतं,' असही अजित पवारांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar lashes out at opponents over Maratha reservation 

---------------------------------------------------------------------

loading image