विधान परिषदेसाठी अजित पवार मैदानात, काँग्रेससोबत बैठक संपताच फोन फिरवला

Ajit Pawar-Sharad Pawar
Ajit Pawar-Sharad Pawaresakal

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकांसाठीची चुरस वाढू लागली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली. यामुळे महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागलं. शिवसेनेचा उमेदवार पडल्याने महाविकास आघाडीचीच नाचक्की झाली. त्यामुळे २० जुलैला पार पडणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांसाठी मविआने ताकद पणाला लावली आहे. गुप्त पद्धतीने मतदान होणार, हे क्लिअर असल्याने सगळ्यांनीच भेटीगाठींना सुरुवात केली आहे. (Ajit Pawar in MLC Election 2022)

यंदा महाविकास आघाडीच्या वतीने अजित पवारच मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार निवडून आणण्याची जबाबदारीही दादांवरच आहे. सध्याचं संख्याबळ पाहता रामराजे नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र एकनाथ खडसे यांचं पारडं अगदी कट-टू-कट आहे. त्यामुळे मतं फुटल्यास खडसेंना त्याचा थेट फटका बसू शकतो. (MLC election 2022 Latest News)

Ajit Pawar-Sharad Pawar
पुणे : विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचे कौशल्य दिसेल ;अजित पवार

यासाठी अजित पवार कामाला लागले असून त्यांनी शिवसेनेच्या गोटातील अतिरिक्त मतं स्वत:कडे फिरवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या काही आमदारांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा फोन आल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दुसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक झाली. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतंफुटीचा धक्का बसू शकतो, यावर चर्चा झाली. तसेच मतांचे प्राधान्यक्रम ठरवण्यात आले.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाठिंब्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आल्याचं समजतं. त्यामुळे आता आपल्या दुसऱ्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेनेच्या गोटातील आमदारांनाही गळाला लावण्याची शक्यता आहे. या सगळ्यात शिवसेनेचं मत अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र अजित पवार मैदानात सक्रिय झाल्याबद्दल संजय राऊत यांनीही माध्यमांना माहिती दिली.

Ajit Pawar-Sharad Pawar
भाजपकडून शेवटच्या क्षणी खेळी, सदाभाऊ खोतांना मुंबईला बोलावलं

भाजपकडून खडसेंवर निशाणा

भाजप एकनाथ खडसे यांचा गेम करण्याच्या तयारीत आहे. खडसे यांच्या पदरी हार आल्यास त्यांचा विधानभवनातील रस्ता बंद होणार आहे. खडसे यांना भाजपमध्ये डावललं गेल्याने त्यांनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादीच्या तिकीटावर देखील त्यांचा पराभव करून महाविकास आघाडी आणि थेट पवारांनाच आव्हान द्यायचं, प्लॅनिंग भाजपचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com