
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.