esakal | अजित पवारांनी कापले परतीचे दोर; पंतप्रधान मोदींना दिला 'हा' शब्द 
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar twitter posts after being deputy cm maharashtra government formation

अजित पवारांनी कापले परतीचे दोर; पंतप्रधान मोदींना दिला 'हा' शब्द 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अज्ञातवासात राहिलेले अजित पवार सोशल मीडियावर अॅक्टिव झाले आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या केंद्रीय आणि भाजप नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे आभार अजित पवार यांन मानले आहेत. ट्विटरवर अजित पवार यांचे हे आभार प्रदर्शन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असताना, अजित पवार यांनी भाजप नेत्यांचे आभार मानलायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या मनधरणीलाही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळं त्यांनी परतीचे दोर कापल्याचं मानलं जातंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे एप

परतीचे दोर कापले?
ट्विटरवर कालच अजित पवार यांना भाजप नेत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. पण, काल बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी राहिलेल्या अजित पवार यांनी आज, भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी दहा मिनिटांत अकरा ट्विट केले आहेत. विशेष म्हणजे, आज सकाळीही राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी अजित पवार यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली. पण, अजित पवार यांचं मन वळवण्यात ते अपयशी ठरल्याचं कळतंय. जयंत पाटील आणि वळसे-पाटील यांच्या भेटीनंतरच अजित पवार यांनी ट्विटरवर भाजप नेत्यांना रिप्लाय देण्यास सुरुवात केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी राज्यात स्थिर सरकार देण्याचा शब्द दिला आहे. तसेच राजनाथ सिंह, अमित शहा यांनाचेही त्यांनी आभार मानले आहेत. आज सकाळी अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट करून, अजित पवार यांना पुन्हा स्वगृही परतण्याचे आवाहन केले होते. पण, अजित पवार यांनी परतीचे सर्व दोर कापल्याचे दिसत आहे. 
 

loading image