VIDEO : कुणी सांगितलं मी नाराज आहे? पाहा रोखठोक अजित पवार..

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

आज अनेक दिवसांनी अजित पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.  अत्यंत मोकळेपणाने अजित पवार हे माध्यमांशी बोलताना पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण बऱ्याचअंशी कमी झालेला पाहायला मिळाला. नक्की कोणत्या मुद्द्यांवर अजित पवार यांनी चर्चा केली पाहा. 

आज अनेक दिवसांनी अजित पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.  अत्यंत मोकळेपणाने अजित पवार हे माध्यमांशी बोलताना पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण बऱ्याचअंशी कमी झालेला पाहायला मिळाला. नक्की कोणत्या मुद्द्यांवर अजित पवार यांनी चर्चा केली पाहा. 

कुणी सांगितलं मी नाराज आहे ? 

अजित पवार यांनी तुम्ही नाराज आहात का हे विचारलं असता, कुणी सांगितलं मी नाराज आहे, तसं नाहीये, कोणतंही कारण नसताना मीडियामध्ये बातम्या पसरवल्या जातायत. आज उद्धव ठाकरे शपथ घेतायत, आमचे (राष्ट्रवादी) दोन नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे शपथ घेणार आहेत. त्यामुळे मी नाराज नसल्याचं तअजित पवार म्हणालेत. कॉंग्रेसच्या नेत्यांचा निर्णय सोनिया गांधी किंवा अहमद पटेल यांच्याकडून नाव येतील. ते कॉंग्रेसतर्फे आज शपथ घेणार आहेत. आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून राहिलेली दोन नावं येणार . आज एकूण सात लोकं शपथ घेणार आहे. विश्वास दर्शक ठराव झाल्यावर पुढील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे 

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, नेमकं काय घडलेलं ?  

"त्याबद्दल मी आता काहीच सांगणार नाही, आज सर्वांसाठी एक चांगला खुशीचा दिवस आहे. ज्यावेळेस माझं मन मला सांगेल, याबद्दलची माहिती दिली पाहिजे त्यावेळेस मी माहिती देईन. त्यामुळे कधी ही माहिती कधी द्यायची, कधी काय सांगायचं त्याचा सर्वस्वी माझा अधिकार आहे. आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे, त्यामुळे योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल सांगेन.  त्यामुळे त्याबद्दल नो कॉमेंट्स, असं अजित पवार म्हणालेत. 

मंत्रीपदाची शपथ कधी घेणार? 

आज आमच्या पक्षाकडून जयंत पाटील आणि भुजबळ साहेब शपथ घेणार आहेत. या नंतर मंत्रिमंडळ विस्तार हा कदाचित पुढच्या महिन्यात होणार आहे. या नंतर आमचे नेते शरद पवार किंवा राज्य स्तरावरील निर्णय घेणारे नेते याबाबत निर्णय घेतील. कॉंग्रेसचे नेते कॉंग्रेसचा निर्णय घेतील आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचा निर्णय घेतील. पुढील  मंत्रिमंडळविस्तार करताना तीनही पक्षाचं बोलणं  होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. 

विधानसभा अध्यक्ष पदाबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत मतभेद ? 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजिबात मतभेद नाहीत. काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आमची बैठक झाली. चर्चेअंती काही निर्णय घेण्यात आलेत. आज पुन्हा तीनही पक्षांचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत तीनही पक्षांचे नेते अधिकृत माहिती देणार आहेत.

 

उद्धव ठाकरे यांच्याकडून काय अपेक्षा ? 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर गेल्या दिवसात झालेल्या पावसामुळे मोठं संकट आलंय. शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावेत. महाराष्ट्रातील जनतेसाठी जे बोललं जात होते, त्या सर्व गोष्टी केल्या जाव्यात. महाराष्ट्रात बेकारी आणि बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना नोकर्या नाहीयेत. यावर निर्णय घेण्यात यावेत.  महाराष्ट्राला एक स्थिर सरकार कसे देता येईल याबाबत निर्णय घेण्यात यावेत.  या सोबतच महाराष्ट्र अनेक कामं सुरु आहेत, यामध्ये रस्त्याची कामं आहेत, घरांच्या निर्माणाची कामं आहेत, मेट्रोची कामं सुरु आहेत. या सर्व कामांवर कोणताही परिणाम न होता ही कामं त्याच गतीने पुढे जावीत. शेतकरी अडचणीत आहे त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी धडक कार्यक्रम तातडीने हाती घेण्यात यावा.  

WebTitle : ajit pawars exclusive interview on current government formation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawars exclusive interview on current government formation