'त्या' विषयी मी योग्य वेळी बोलेन - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

अजित पवार यांच्याबद्दल सकाळ पासून अनेक बातम्या फिरत आहेत. यावर अजित पवार यांनी मौन सोडलंय. अजित पवार यांनी मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला हजेरी लावणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय. कोणत्याही गोष्टीवर मी रागावलेलो नाही हे देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. 

शपथविधीसाठी  अजित पवार साडे चार वाजता निघणार आहेत. अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासोबत शपथविधीला हजेरी लावणार आहेत. दरम्यान, पत्रकारांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासंदर्भात छेडलं असता, त्या विषयावर मी योग्य वेळी बोलेन असं स्पष्ट केलं. गेले चार दिवस मी त्याबद्दल काहीही बोललो नाही. योग्य वेळ आल्यावर मी पत्रकारांशी बोलणार असल्याचं अजित पवार म्हणालेत. मी कोणत्याही गोष्टीवर नाराज नाही, पक्षाचा निर्णय माझ्यासाठी अंतिम निर्णय असणार आहे, असं देखील अजित पवार यांनी नमूद केलंय. 

अजित पवार म्हणाले, की आज फक्त मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर बाकी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. स्वतः अजित पवार आज शपथ घेणार नाहीत. शिवसेना आणि काँग्रेसची नावे मला माहिती नाही. राष्ट्रवादी संदर्भातील सर्व निर्णय पक्ष घेईल. पक्षाने फक्त जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोघेच आज शपथ घेणार आहेत

Webtitle : ajit pawars statement on his decision of taking oath as deputy CM 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawars statement on his decision of taking oath as deputy CM