आचारसंहितेच्या कालावधीत करण्यात आलेल्या जप्तीच्या कारवाईत आतापर्यंत २७ कोटी ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत या वेळी जवळपास साडेतीन पटीने अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बेकायदेशीर दारू, शस्त्र, अमली पदार्थ यांसह मौल्यवान धातूच्या वाहतुकीचा सुळसुळाट सुरू होता. कोणत्याही आर्थिक प्रलोभनाशिवाय निवडणुका पार पाडल्या जाव्यात यासाठी रायगड पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती. यामध्ये हा मुद्देमाल सापडला आहे.