esakal | निसर्ग चक्रीवादळामुळे पालिकेचे जागते रहो! विभागीय कार्यालयांना सतर्क राहण्याचे आदेश 
sakal

बोलून बातमी शोधा

controll room bmc.

निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. प्रशासनाने मुंबईतील 24 विभाग कार्यालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.  

निसर्ग चक्रीवादळामुळे पालिकेचे जागते रहो! विभागीय कार्यालयांना सतर्क राहण्याचे आदेश 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईत सोमवारपासून मळभ दाटून आले आहे. मंगळवारी वादळाची चिन्हे दिसू लागल्याने मुंबईत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्याने झाडे, विजेचे खांब कोसळण्याचा धोका आहे. वाऱ्यासोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. ही स्थिती लक्षात घेऊन महापालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज करण्यात आले आहेत. 

मोठी बातमी ः पालघरसह डहाणूत 'निसर्ग' वादळाचे संकट; प्रशासनासह 'एनडीआरएफ' सतर्क

तटरक्षक दल, नौदल, मुंबई अग्निशमन दल यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके सुसज्ज करण्यात येत आहेत. मुंबईतील सर्व 24 विभाग कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना धोका पोहोचू शकणाऱ्या वसाहती व सखल भागांतील वसाहती निश्चित करून तेथील रहिवाशांना जवळपासच्या शाळा अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

मोठी बातमी ः 1882 च्या विनाशकारी 'द ग्रेट बॉम्बे सायक्लॉन' बद्दलची Inside Story !

कंपन्या, रुग्णालयांना सूचना
मुंबईतील मोठ्या औद्योगिक आस्थापना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांनी यंत्रणा व सामग्री सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना तातडीने कराव्यात,  असे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व रुग्णालयांनी वीज जनित्रे सुरू असल्याची खातरजमा करावी. वीजपुरवठा अखंड सुरू राहील, याची तजवीज करावी, असे सांगण्यात आले आहे.

loading image
go to top