esakal | अनलॉक तर होतंय पण, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी केलीये ही मोठी मागणी...
sakal

बोलून बातमी शोधा

अनलॉक तर होतंय पण, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी केलीये ही मोठी मागणी...

अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. लॉकडाऊनच्या प्रश्नातून सावरण्यासाठी प्रत्येकाला साह्य हवे आहे. आता रिक्षा आणि टॅक्सी संघटनेने भाडेवाढ करण्याची परवानगी मागितली आहे. त्याचबरोबर सर्व प्रवाशाना प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 

अनलॉक तर होतंय पण, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी केलीये ही मोठी मागणी...

sakal_logo
By
संजय घारपुरे

मुंबई ः अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. लॉकडाऊनच्या प्रश्नातून सावरण्यासाठी प्रत्येकाला साह्य हवे आहे. आता कुड्रोस या रिक्षा आणि टॅक्सी संघटनेने भाडेवाढ करण्याची परवानगी मागितली आहे. त्याचबरोबर सर्व प्रवाशाना प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 

मोठी बातमीः बाळासाहेब थोरात यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला...

टॅक्सी आणि रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींची राज्य सरकारबरोबर चर्चा झाली. त्यावेळी संघटनेने सध्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांची परिस्थिती बिकट आहे. त्यातच त्यांना केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता सर्वच प्रवाशांच्या प्रवासास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन कालावधीसाठी महिना दहा हजार रुपये मदत करण्याबाबतही सरकारला साकडे घालण्यात आले आहे. 

मोठी बातमी - अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील सारथी संस्थेसंदर्भातील बैठकीत गोंधळ

प्रवाशांसाठी महत्त्वाचा मुद्दा भाडेवाढीचा आहे. टॅक्सी चालकांनी कमीतकमी भाडे 22 ऐवजी 25 असावे अशी मागणी केली आहे, तर रिक्षा चालकांना 18 ऐवजी कमीतकमी भाडे 22 रुपये हवे आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन कालावधीत जप्त करण्यात आलेल्या रिक्षा इ-चलनची वसूली न करता मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी विदर्भात पाच रिक्षा चालकांनी आत्महत्त्या केली आहे, याकडे लक्ष वेधले आहे. मुंबईत सव्वादोन लाख रिक्षांची नोंदणी आहे. त्याशिवाय हजारो रिक्षाचालकही आहेत. त्यांनाही तीन महिन्यापासून काहीही उत्पन्न नाही. त्यातच केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच रिक्षा, टॅक्सी उपलब्ध आहेत, याकडेही लक्ष वेधण्यात आले.

----------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)