esakal | हापूसप्रेमींनो हे वाचाच 
sakal

बोलून बातमी शोधा

हापूस हंगाम लांबणीवर पडणार आहे.

अलिबाग, रायगडचा हापूस म्हणजे जिभेवर रेंगाळणारी मधुर चव. त्यामुळे अस्सल खवय्ये त्याला पहिली पसंती देतात, पण आता ही चव चाखण्यासाठी यंदा एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हापूसप्रेमींनो हे वाचाच 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबागः अलिबाग, रायगडचा हापूस म्हणजे जिभेवर रेंगाळणारी मधुर चव. त्यामुळे अस्सल खवय्ये त्याला पहिली पसंती देतात, पण आता ही चव चाखण्यासाठी यंदा एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या सात महिन्यांत आलेली पाच वादळे आणि उशिराने सुरू झालेल्या थंडीमुळे हा परिणाम झाला आहे. त्यामुळे या पिकाचे अर्थकारण बिघडणार आहे. 

अलिबाग अर्थात रायगड जिल्ह्यातील हापूसचा हंगाम जानेवारीदरम्यान किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला सुरू होतो. यंदा हा हंगाम दीड ते दोन महिने लांबणीवर पडेल, असा अंदाज बागायतदार आणि कृषी तज्ज्ञांचा आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून किनारपट्टीवर वारंवार वादळे आली. 

पावसाळ्याच्या अखेरीस क्‍यार वादळाने धडक दिली. त्यामुळे थंडीचे आगमनही उशिरा झाले. हवामानाच्या सततच्या बदलामुळे जिल्ह्यातील हापूस संकटात आला आहे. 
सुरुवातीला या फळाचा हंगाम 20 ते 25 दिवसांनी उशिरा सुरू होईल असा अंदाज होता. आता कृषीतज्ज्ञांच्या अंदाजानुसार तो तब्बल एक ते दोन महिने लांबणीवर पडला. 

या आठवड्यात थंडीची चाहूल लागल्याने आंब्याच्या झाडांना पालवी फुटत आहे. त्यामुळे बागायतदार सुखावला होता, परंतु पिकाची फळधारणा आणि आंबा काढणी प्रक्रिया आणि मान्सूनचा हंगाम या गोष्टीवर आता बागायतदारांचे लक्ष राहणार आहे. 

धक्कादायक : म्हणून वडखळचा प्रवास नको म्हणतात 

प्रतिकूल परिस्थितीत आंब्याची निर्यात करण्यासाठी "मॅंगोनेट' प्रणालीकडे बागायतदारांचा वाढता कल आहे. यासाठी प्रणालीबाबत प्रशिक्षण शिबिर, शेतीशाळा मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात येत आहे. स्थानिक हापूस विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार या पिकाबाबत बाजारपेठेत दराबाबत संभ्रम आहे. दीड ते दोन महिन्यांनी हंगाम लांबणीवर पडल्याने बाजारपेठेत हापूसला दर काय मिळणार याबाबतही अंदाज येत नाही. 

हे सुद्धा वाचा : वरंध घाट, तुळशी खिंडीचा मार्ग सुकर

असे आहे "मॅंगोनेट' 
भारतातून आंब्याची निर्यात 72 देशांना आणि आंबारसाची निर्यात 141 देशांना केली जाते. या फळाच्या निर्यातीतील संधी लक्षात घेता शेतकऱ्यांचा कल निर्यातक्षम आंबा उत्पादन व त्याची निर्यात करण्याकडे वाढत आहे; परंतु सध्या जागतिक बाजारपेठेत कृषिमाल निर्यातीकरिता आवश्‍यक कार्यपद्धती, गुणवत्ता, प्रमाणके, नियम, अटी, शर्ती इत्यादीबाबतची अद्ययावत माहिती देण्याची मागणी आहे. युरोपियन आणि इतर देशांना आंबा निर्यातीकरिता प्रामुख्याने कीडनाशक व रोगमुक्त उत्पादनांची हमी देणे आवश्‍यक असते. हे काम वेबसाईटद्वारे करण्यात येत असून त्याबाबतची "मॅंगोनेट' ही ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित केली आहे. रायगड जिल्ह्यातील बागायतदारांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. 
वातावरणात अस्थिरता असल्याने त्याचा परिणाम आंबा पिकावर होऊ शकतो. रायगड जिल्ह्यातील बागायतदार स्थानिक बाजारात आंबा विक्रीवर जास्त भर देतात; मात्र येथील बागायतदारांनी निर्यातीकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. 

- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक, अधिकारी 


 

loading image
go to top