रुग्णवाहिकेशी केला संपर्क, मागितले अवाच्या सव्वा पैसे, शेवटी ओढवली 'ही' वेळ; मुख्यमंत्रीसाहेब पाहताय ना ?

रुग्णवाहिकेशी केला संपर्क, मागितले अवाच्या सव्वा पैसे, शेवटी ओढवली 'ही' वेळ; मुख्यमंत्रीसाहेब पाहताय ना ?

मुंबई : एकीकडे घरातील बेताची परिस्थिती दुरीकडे रुग्णवाहिकेची कोरोना महामारीत सुरु असलेली लूट, यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झालेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील नालासोपाऱ्यात एक हृदयद्रावक घटना घडलीये. कुटुंबीयांकडे पैशाची असलेली कमतरता पाहता थेट एका टॅक्सीच्या टपावर तिरडी बांधून त्यावर मृतदेह ठेवत स्मशानभूमीत आणून अत्यंसंस्कार करण्यात आलेत. हृदयाला पिळवटून टाकणारी घटना नालासोपारा पूर्व इथली आहे.  

नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव येथे राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. घरच्यांनी रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. आधीच आईच्या डायलिसिसवर खूप खर्च झाला त्यात रुग्णवाहिकेने २ किलोमीटरचे तीन हजार रुपये मागितले. शेवटी अव्वाच्या सव्वा पैसे मागितल्याने रुग्णवाहिकेला नाही सांगण्यात आलं. एकीकडे कोसळलेला दुःखाचा डोंगर आणि त्यात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्यात येणारी अडचण समोर होती. मग काय कुटूंबियांनी तुळींज येथील स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी चक्क एका टॅक्सीचा आधार घेतला.

टॅक्सीच्यावर तिरडी बांधण्यात आली आणि पूर्वेकडील तुळींज, टाकीरोड मार्गावरून स्मशानभूमीत नेण्यात आले. कोरोना महामारीमुळे रोजगार, व्यवसायावर झालेले परिणाम, पैशाची चणचण आणि त्यात काही रुग्णवाहिकेकडून सुरू असलेली लूट पाहता अखेर मृतदेह नेण्यासाठी कुटुंबीय पर्याय शोधू लागले आहेत.

तुळींज स्मशानभूमीत दिवसाला 8 ते 10 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात. त्यामुळे मृतदेह कोणाचा हे नाव शोधणे कठीण आहे. रविवारी एक मृतदेह टॅक्सीतून आणण्यात आला होता. त्यांच्याकडे रुग्णवाहिकेसाठी पैसे नव्हते असे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना विचारले असता सांगितले असल्याची माहिती नालासोपारा आचोळे प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांनी सकाळशी बोलताना दिली.

ambulance driver asked 3 thousand for 2 km relative of covid demised did this

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com