मोठी बातमी : 5 ऑगस्टपासून सुरू झालेले मॉल 6 ऑगस्टपासून बंद, महापालिका आयुक्तांचा निर्णय

सुजित गायकवाड
Thursday, 6 August 2020

सिवूडसमधील एका मॉलमध्ये पहिल्याच दिवशी तब्बल साडे तीन हजार ग्राहकांनी भेट दिली.

नवी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 5 ऑगस्टपासून सुरू झालेले मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बांगर यांच्या आदेशामुळे काल सुरू झालेले मॉल आजपासून पुन्हा बंद करण्यात आले आहेत. कोरोनामुळे पुन्हा एकदा ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. 

संपूर्ण राज्यात 5 ऑगस्टपासून नागरिकांमध्ये अंतर ठेवून आणि काटेकोरपणे नियम पाळून मॉल सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली होती. त्या परवानगीनुसार राज्यसहित नवी मुंबईतील मॉल बुधवार पासून सुरू झाले होते. नवी मुंबई शहरात कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि सिवूडस भागातील मॉल पुन्हा खुले करण्यात आले होते. ग्राहकांनी मॉलमध्ये यावं या साठी काही मॉलमध्ये आकर्षक भेट वस्तू देखील ग्राहकांना दिल्या गेल्या.

मोठी बातमी - रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन आणि म्हणालेत...

सिवूडसमधील एका मॉलमध्ये पहिल्याच दिवशी तब्बल साडे तीन हजार ग्राहकांनी भेट दिली. पहिल्याच दिवशी एवढ्या संख्येने ग्राहकांनी प्रतिसाद दिल्यामुळे मॉल व्यवस्थापन देखील भारावून गेले होते. मॉलमधील 60 टक्के दुकाने सुरू असली तरी कोरोनाकाळात मिळालेला प्रतिसाद पाहता मॉल व्यवस्थापनांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या.

मात्र नवी मुंबईत अद्यापही कोरोना नियंत्रणात आलेला नाही. शहरातील प्रत्येक नोडमध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. यापैकी कोरोना रुग्ण मॉलमध्ये येऊन गेल्यास पुन्हा कोरोनाचा स्फोट होऊ शकतो आणि सध्या हातात असलेली परिस्थितीत हाताबाहेर जाऊ शकते.

मोठी बातमी - V.V.I.P मलबार हिल परिसरात पावसाने खचला रास्ता, घटनेची शास्त्रीय तपासणी होणार

या भीतीमुळे अभिजीत बांगर यांनी पुन्हा मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशमुळे 5 ऑगस्टपासून सुरू झालेले मॉल 6 ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे नवी मुंबईतील ग्राहकांना मॉल सुरू झाल्याचा आनंद एक दिवसाचा ठरला आहे.

amid corona malls in navi mumbai will remain close untill further notice NMMC commissioner


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amid corona malls in navi mumbai will remain close untill further notice NMMC commissioner