Amit Shah : मुंबईवर फक्त भाजपचंच वर्चस्व राहिले पाहिजे; शाहांनी दंड थोपटले

Amit Shah
Amit Shah

Amit Shah Mumbai Tour : मुंबईवर फक्त भाजपचंच वर्चस्व राहिलं पाहिजे असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर केला आहे. शिवसेनेने आमच्या पाठित खंजीर खुपसल्याचही ते म्हणाले. शिवसेना स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाल्याचे म्हणत फक्त दोन जागांसाठी शिवसेने युती तोडल्याचं शहा यांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. बीएमसीसाठी भाजप शिंदे गटाचं 150 चं टार्गेट असून, खयाली पुलावामुळे शिवसेनेची सध्याची अवस्था झाल्याचं शाह म्हणाले.

Amit Shah
Jharkhand Crisis : झारखंड विधानसभेत हेमंत सोरेन यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

आम्ही शिवसेनेला छोटा पक्ष केलं नाही उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका दिला. राजकारणात धोका देणाऱ्यांचे राजकारण यशस्वी होत नाही. एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ते आपल्यासोबत आहेत. राजकारणात धोका सहन करू नका असे म्हणत बीएमसी जिंकण्यासाठी तयारीला लागा असे आदेश शाह यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.आपल्याला हिंदूंविरोधी राजकारण संपवायचं असून, बीएमसीसाठी भाजप-शिंदे गटाचं १५०चं टार्गेट असून, मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार असा विश्वास व्यक्त करत शाह म्हणाले. आपली ही शेवटची निवडणूक आहे असं समजा, कारण अभी नही तो कभी नही असे शाहा म्हणाले.

Amit Shah
Teacher's Day : पंजाबमध्ये शिक्षकांना मिळाला 'मान' CM कडून '7th पे' ची घोषणा

एकनाथ शिंदेंचीच सेना खरी शिवसेना

बंडखोरीनंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद सुरू असून, यावर अद्यापपर्यंत सुप्रीम कोर्टाने कोणताही अंतिम निर्णय सुनावलेला नाही. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा पेच कायम आहे. मात्र, शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप करत एकनाथ शिंदे यांची सेनाच खरी शिवसेना असल्याचं शाह यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com