esakal | अमित ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला जायला आवडेल!
sakal

बोलून बातमी शोधा

अमित ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला जायला आवडेल!

अमित ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला जायला आवडेल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे आज शपथ घेत आहेत.शिवाजी पार्क येथे होणाऱ्या शपथविधीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार का यावर तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत."उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबातील आहेत;त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहायला आवडेल" अशी भावना व्यक्त करत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनी राज ठाकरे कुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिले.

ठाकरे कुटुंबाला पहिला ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय.यामुळे सर्व ठाकरे कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित राहतील.मात्र भाऊ असले तरी पक्के राजकीय वैरी असलेले राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित राहतील का याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. उद्धव ठाकरे राज ठाकरेंना निमंत्रण देतील का याकडे ही सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाला निमंत्रण पत्रिका तर पाठवली आहेच शिवाय आज सकाळी स्वता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केल्याचे समजते.

उद्धव ठाकरे हे राज ठाकरे वास्तव्यास असलेल्या कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानासमोरील शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.शिवाय उद्धव ठाकरे यांच्या रुपात ठाकरे घरातील व्यक्ती पहिल्यांदाच मुख्यमंत्री होतोय.राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना उपस्थितीबाबत विचारलं असता त्यांनी 'उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबातील आहेत;त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहायला आवडेल" असे सांगत राज ठाकरे कुटुंबीय आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिले.अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात नवी मुंबईत मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

WebTitle : amit thackeray on oath takin ceremony of uddhav thackeray

loading image