सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी अमृता फडणवीसांचे मोठे व्यक्तव्य; वाचा काय केले ट्विट

तुषार सोनवणे
Monday, 3 August 2020

आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस तसेच बिहार पोलिस देखील करीत आहेत. बिहारच्या पाटण्यावरून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना बृहंमुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केले आहे. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि बिहारच्या डिजीपींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अनेक राजकीय व्यक्तींनी आपले मत मांडले आहे. त्यातच आता विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

गणेश उत्सव २०२० : 'हा' बाप्पा दरवर्षी मुंबई ते काश्मीर करतो प्रवास, यंदाही परंपरा अखंडित..

अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असे वाटते की, मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहण अजिबात सुरक्षित नाही. या ट्विट सोबत त्यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅग वापरले आहेत.

सुशांतच्या मृत्यूच्या चौकशी साठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे विमानाने पाटण्याहून मुंबईत आले होते. त्यांना बीएमसी अधिकाऱ्यांनी 14 दिवस क्वॉरंटाईन केले आहे. आणि त्यांचे क्वॉरंटाईन नियमाला धरून आहे. असं पालिकेने स्पष्ट केले आहे. तिवारी हे देशांतर्गत प्रवासी असल्याने त्यांना कोविड19 च्या राज्य सरकाच्या नियमांनुसार होम क्वॉरंटाईन करणे गरजेचे असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबईतल्या ७४ वर्षांच्या ज्येष्ठामुळे दोघांना जीवदान; फुफ्फुस, यकृताचं यशस्वी प्रत्यारोपण

“सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करुन बिहार पोलीस फक्त कर्तव्य बजावत आहेत’’ असे म्हणत बिहारचे मुख्यंमंत्री नितिश कुमार यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. विनय तिवरींच्या क्वॉरंटाईनमुळे अनेक चर्चांना उधान आले आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amrita Fadnaviss statement on Sushant Singhs deathcase; Read what the tweet did