अमृता फडणवीस करणार 'शिवतांडव'; हातात त्रिशूळ घेऊन केली घोषणा

अमृता फडणवीस करणार 'शिवतांडव'; हातात त्रिशूळ घेऊन केली घोषणा

मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सातत्याने चर्चेत असतात. त्या आपल्या स्वतंत्र मतांसाठी जशा प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे त्या आपल्या पार्श्वगायनासाठीही प्रसिद्ध आहेत. त्या आता आपल्या चाहत्यांसाठी एक खुशखबर घेऊन आल्या आहेत. त्यांचं एक नवं गाणं आता येत आहे. याची घोषणा त्यांनी आपल्या सोशल मीडियावरुन केली आहे. (Amruta Fadnvis)

अमृता फडणवीस करणार 'शिवतांडव'; हातात त्रिशूळ घेऊन केली घोषणा
मोठी बातमी! ED ने नवाब मलिकांना घेतलं ताब्यात, घरावर छापे

अमृता फडणवीस या नवनवी गाणी गाऊन त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यांच्या या गाण्यांवर काहीवेळा टीका आणि ट्रोलिंगही होताना दिसून येतं. मात्र, तरीही अमृता फडणवीस या साऱ्या प्रकाराला दुर्लक्षित करुन नवनवी गाणी घेऊन येताना दिसतात. 'जटा टवी गलज्जलप्रवाह पावितस्थले' असं कॅप्शन त्यांनी पोस्टरला दिलं आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, भक्ती ही दुर्मिळ आणि एक आकर्षक अशी आध्यात्मिक यात्रा आहे! 24 फेब्रुवारी 2022 रोजी माझ्या आयुष्यातील सर्वात दैवी संगीतमय अनुभव रिलीज होत आहे, असं त्यांनी म्हटलंय.

व्हॅलेंटाईन दिनाला केलं पोस्टर लाँच

विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन दिनादिवशी घोषणा केलेलं हे गाणं भगवान शिवशंकराचं असण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शंकराच्या अवतारात स्वत:चाच फोटो टाकला आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, मी तुझी निवड आता आणि कायमस्वरूपी केली आहे. तू माझ्या हृदयात आहेस, माझ्या मनात, माझ्या आत्म्यात, विश्वासात आणि श्वासातही आहेस. हा व्हॅलेंटाईन डे जो आपल्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमासाठी ओळखला जातो, त्या दिवशी मी माझ्या रुद्राला एक संगीतमय स्तुती अर्पण करतेय. पुढे त्यांनी #valentine #lordshiva असे दोन हॅशटॅगही दिले आहेत. तसेच लवकरच येत असल्याची घोषणाही केली आहे.

अमृता फडणवीस करणार 'शिवतांडव'; हातात त्रिशूळ घेऊन केली घोषणा
नवा लूक, नवं गाणं; अमृता फडणवीसांची चाहत्यांसाठी खुशखबर

'तिला जगू द्या', 'गणपती साँग' आणि आता 'शिवतांडव'

येत्या महाशिवरात्रीपर्यंत नवा मुझिक अल्बम घेऊन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 'शिवतांडव स्त्रोत्रम्' नावाने त्या गाणं येणार असल्याची चर्चा आहे. याआधी अमृता फडणवीसांनी अनेक गाण्याचे अल्बम काढले आहेत. फडणवीस यांचं गणपतीवर गाणं आलं होतं. यानंतर 'तिला जगू द्या', हे तरुणींवरील अत्याचाराला वाचा फोडणारं गाणंही हीट झालं. तर, देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांनी राज्यातील नद्यांवरही गाणं गायलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com