...तर , कृत्रिम प्राणवायू विकत घेऊन जगावे लागेल      

mumbai
mumbai

डोंबिवली : चांगली संवर्धन केलेली झाडे मोठ्या प्रमाणावर भस्मसात झाली ही घटना नक्कीच निंदनीय आहे. आपल्या पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी आपण मेहनतीने धनसंचय करतो. त्यापेक्षा जास्त लक्ष देऊन आपण वनसंपदेचे संवर्धन व जतन करण्याची गारज आहे. जर झाडे नसतील तर भविष्यात आपल्याला कृत्रिम प्राणवायू विकत घेऊन जगावे लागेल व हे सर्वसामान्य जनतेला अशक्य आहे. त्यासाठी कुणीही वैर्याच्या  वृक्षांना दगाफाटका न करता संवर्धन करण्याची नितांत आवश्यकता आहे.'' , अशी प्रतिक्रिया  कल्याण पूर्वचे भाजपा सहयोगी, आमदार गणपत गायकवाड यांनी वार्तालाप कार्यक्रमात  मांगरुळ येथील वनजमीनीवर मानवनिर्मित वनराई आगीच्या भक्षस्थानी पडून 70% झाडे नष्ट झाल्याप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना व्यक्त केली.      
                                         
कल्याणचे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे दरवर्षी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून वृक्षारोपण मोहिम हाती घेऊन प्रत्येक झाड जगविण्यासाठी परिश्रम घेतात. या उपक्रमाची प्रशंसा करुन ''पुढील पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांच्या चांगल्या कामी हातभार लावता येत नसेल तर निदान कोणीही अशाप्रकारे चांगली वाढ होत असलेली झाडे जाळण्याचा दुसऱ्य़ांदा झालेला प्रयत्न म्हणजे परिसरातील गावांमधील स्थानिक जनतेचे मोठे नुकसान आहे.'' असे गायकवाड म्हणाले.              
             
 मोबाईलवर बातम्या वाचण्यासाठी सकाळचे अॅप डाऊनलोड करा

आपण करत असलेल्या बेसुमार जंगलतोडीमुळेच नैसर्गिक पाण्याची पातळी कमी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून जनतेवर बाटलीबंद पाणी विकत घेऊन पिण्याची जशी वेळ आली आहे. तीच भीती जर आपण जंगले वाचवली व वाढवली नाहीतर नातवंडांना जगण्यासाठी प्राणवायू विकत घ्यावा लागेल. म्हणून वाटते म्हणून आपल्यासाठी नाही तर पुढील पिढीसाठी प्रत्येकाने किमान दोन झाडे जगविण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com