.आणि मुख्यमंत्री उल्हासनगरातील कलानी परिवारासाठी गाडीतून उतरतात तेंव्हा

दिनेश गोगी
रविवार, 1 जुलै 2018

उल्हासनगर : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला वरप गावाकडे जात असतानाच, ते उल्हासनगरातील कलानी परिवाराकडून स्वागत स्वीकारण्यासाठी रोडवर गाडीतून उतरले. त्यामुळे उल्हासनगर आणि कलानी परिवार हे एक समीकरण असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक वागण्याने पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांना महापौरपद मिळणार काय? या सवालाने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. 

उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या वरप गावात सर्व्हे नंबर 25 या राधास्वामी सत्संग जवळील जमिनीवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवाजम्यासह गाडीने जात होते.

तेंव्हा हायवेवरील सीमा रिसॉर्ट समोर आमदार ज्योती कलानी, युथ आयकॉन ओमी कलानी, त्यांची पत्नी पंचम कलानी, नगरसेविका रेखा ठाकूर, टीम ओमी कलानी चे प्रवक्ता कमलेश निकम, संतोष पांडे हे फडणवीस यांच्या स्वागतासाठी रोडवर उभे होते. एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस हे रोडवर कसे स्वागत स्विकारणार! अशी शंकेची कुजबुज सुरू असतानाच फडणवीस यांची लवाजम्या सोबत असलेली गाडी चक्क सीमा रिसॉर्टवर थांबली. हसतमुख चेहऱ्याने ते गाडीतून उतरले. स्वागत स्वीकारून वरपच्या दिशेने रवाना झाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळून स्वागत स्वीकारण्यासाठी गाडीतून उतरल्याचा मोठेपणा दाखवल्याने कलानी परिवार सुखावून गेल्याचे चित्र दिसत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कलानी परिवाराच्या या रोडवरील भेटीने उल्हासनगरात महापौर पदाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. टीम ओमी कलानीच्या नगरसेवकांच्या बळावर प्रथमच मीना आयलानी ह्या भाजपाच्या महापौर बनल्या आहेत. पहिले सव्वा वर्ष आयलानी आणि पुढील टर्म ही पंचम कलानी यांचा हा करार झालेला आहे. आयलानी यांचा महापौर पदाचा टर्म येत्या 5 जुलै रोजी संपत आहे. मात्र भाजपाचा प्रमुख गट हा कलानी यांना महापौर पदापासून लांब ठेवण्याचा डाव खेळत आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कलानी यांना महापौर पद देण्याचे आश्वासन सत्ता स्थापनेच्या वेळी दिले होते. आजची फडणवीस आणि कलानी परिवाराची झालेली भेट गृहीत धरून पंचम कलानी यांना मिळणार काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And when the chief minister comes down from the car for the Kalni family in Ulhasangan