Mumbai : अंधेरी पूर्व निवडणुक : ऋतुजा लटके पदवीधर, तर मुरजी पटेल नववी पास

जंगम, स्थावर मालमत्ता अन् कर्जात मुरजी पटेलच सरस
Andheri-East Election
Andheri-East Election sakal

मुंबई : अंधेरी पूर्व निवडणुकीसाठी एकुण २५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु त्यापैकी १४ उमेदवारांची नामनिर्देशने वैध ठरल्याचे निवडणुक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एकुण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु मुख्य लढत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यातच होणार आहे. या दोघांचेही अर्ज निवडणूक आयोगाने स्विकारले आहेत. तर ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचा अर्ज मात्र बाद करण्यात आला आहे. या दोघांचीही प्रतिज्ञापत्रे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड झालेली असून दोघांनीही आपली मालमत्ता या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. शैक्षणिक पात्रता, बॅंक खात्याचे आणि गुंतवणुकीचे पैसे तसेच मालमत्तेच्या बाबतीत दोन्ही उमेदवारांमध्ये चढाओढ ही प्रतिज्ञापत्राच्या आकडेवारीतून दिसून आली आहे. ऋतुजा लटके या कॉर्मस शाखेतील पदवीधर आहेत, तर मुरजी पटेल हे नववी पास आहेत. जंगम मालमत्तेच्या बाबतीत ऋतुजा लटके यांच्यापेक्षा मुरजी पटेल सरस आहेत. तसेच लटके यांच्याकडे एकही वाहन नाही, पण मुरजी पटेल यांच्याकडे मात्र दोन कार आहेत. स्थावर मालमत्तेच्या बाबतीतही ऋतुजा लटके यांच्यापेक्षा मुरजी पटेलच आघाडीवर आहेत. मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तांमध्ये त्यांची गुंतवणुक ही प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून दिसून येत आहे. तर कर्जाच्या रकमेतही मुरजी पटेल यांचे कर्ज ऋतुजा लटकेंपेक्षा अधिक आहे.

फौजदारी खटले

ऋतुजा लटके यांच्याविरोधात कोणताहही फौजदारी खटला किंवा एफआयआ नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून जाहीर केले आहे.  तसेच त्यांच्याविरोधात कोणत्याही न्यायालयात खटला सुरू नाही.

रोख रक्कम

ऋतुजा लटके यांच्याकडे ७५ हजार रूपयांची रोख रक्कम आहे. तर बॅंकांमधील ठेवी, बचत खात्यातील रक्कम ही तीन लाख सहा हजार ६३३ रूपये इतकी आहे. तर ५ लाख ९८ हजार ३२९ रूपयांचे शेअर त्यांच्या नावे आहेत. तर १ लाख ७४ हजार ३२६ रूपयांची रक्कम ही ऋतुजा लटके यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर विविध गुंतवणुकीअंतर्गत १० लाख ११ हजार १४२ रूपयांची गुंतवणुक त्यांनी केली आहे. तर ६ लाख १९ हजार ४४५ रूपयांची गुंतवणुक त्यांच्या नावे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर कोणत्याही वाहनाची नोंद ऋतुजा लटके यांच्या नावे नाही. एकुण ११ लाख रूपयांचे दागिने त्यांच्याकडे आहेत. एकुण ४३ लाख ८९ हजार ५०४ रूपयांची मालम जंगम मालमत्ता त्यांच्याकडे आहे. तर ५१ लाखांची बाजारमूल्याची स्थावर मालमत्ता त्यांच्या नावे आहे. तर ८ कोटी तीन लाख ८४ हजार ८७५ रूपयांची मालमत्ता ही रमेश लटके यांच्या नावे आहे.

कर्जाची रक्कम

 स्वतः ऋतुजा लटके यांच्या नावे १५ लाख २९ हजार ७३९ रूपये इतके कर्ज आहे. तर रमेश लटके यांच्या नावे २ कोटी ४ लाख ४५ हजार ८५७ रूपयांचे कर्ज त्यांच्या नावे आहे.

ऋतुजा लटके यांनी बॅचलर्स ऑफ कॉमर्स ही पदवी एन जी बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथून १९९७ साली घेतली आहे. तर महापालिकेत त्यांनी लिपिक पदावर काम केले आहे. पोट निवडणुकीसाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.मुरजी पटेल यांनी आपल्या नावे कोणताही गुन्हा किंवा खटला प्रलंबित नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे.

मुरजी पटेल यांच्याकडे १ लाख ५ हजार ३२ रूपयांची रोख रक्कम आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ५० हजार ४११ रूपयांची रोख रक्कम आहे. विविध बॅंका, किसान विकास पत्र तसेच दागिने, कर्जाच्या रूपात दिलेली रक्कम अशी एकुण ६३ लाख ९६ हजार ८३२ रूपयांची मालमत्ता त्यांच्याकडे आहे. त्यामध्ये वैयक्तिक टोयोटा इनोवा कारचाही समावेश आहे. तर पत्नीकडेही टोयोटा फॉर्च्युनर कार असून ६५ लाख ८१ हजार २४२ रूपयांची रक्कम आणि मालमत्ता त्यांच्याकडे आहे. तर ५ कोटी ४१ लाख ७१ हजार ६६ रूपयांची मालमत्ता त्यांच्याकडे आहे. तर पत्नीच्या नावे ५ कोटी रूपयांची मालमत्ता त्यांच्या नावे आहे.

कर्जाची रक्कम

मुरजी पटेल यांच्या नावे ९७ लाख ८४ हजार ४१३ रूपयांचे कर्ज आहे. तर  त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी १६ लाख ६३ हजार ५०३ रूपयांचे कर्ज आहे.

मुरजी पटेल यांचे ९ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. ताडदेवच्या वाय जे एस गुजराती नाईट हायस्कुलमधून त्यांनी आपले ९ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. प्रोफेशनल सर्व्हीस प्रोव्हायडर असा व्यवसाय त्यांनी नमुद केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com