

Anganwadi Sevika Salary Update Maharashtra Announces Incentive Allowance of 2000 Rupees for Workers Under New Rules
sakal
मुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता योजनेत सुधारणा केली आहे. सुधारित नियमावलीनुसार अंगणवाडी केंद्रांची कामगिरी दहा निकषांवर तपासली जाणार असून, त्यातील किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या सेविका व मदतनिसांनाच दरमहा हा भत्ता अनुज्ञेय राहील. ही सुधारित योजना नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली.