जयस्वाल यांनी स्वतःला आरोपी म्हणून पाहावे; राज्य सरकारचा न्यायालयात युक्तिवाद

Subodh Kumar Jaiswal
Subodh Kumar Jaiswalsakal media

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कार्यकाळात सीबीआय (CBI) प्रमुख सुबोध जयस्वाल (subodh jayswal) पोलिस महासंचालक होते. पोलिसांच्या बदल्या (police job transfer) आणि शिफारशी त्यांनीच मंजूर केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतःलाच संभाव्य आरोपी म्हणून पाहावे, असा युक्तिवाद आज राज्य सरकारने (mva government) मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) केला.

Subodh Kumar Jaiswal
स्मार्ट कार्डच्या सेमीकंडक्टर चिपचा जगभरात तुटवडा

देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत सीबीआयने विद्यमान पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना समन्स बजावले आहे. याविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यावर न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

देशमुख सन २०१९ ते २०२० मध्ये गृहमंत्री होते, तर जयस्वाल पोलिस महासंचालक त्यामुळे जयस्वाल यांनी पोलिसांच्या बदल्या आणि शिफारशी मंजूर केल्या आहेत; मात्र आता या प्रकरणी ते तपास करत आहेत. म्हणजे देशमुख यांनी स्वतःच स्वतःच्या आरोपांची चौकशी केल्यासारखे आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी केला. तसेच निष्पक्ष तपास होत असल्याचे सांगणे हास्यास्पद आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com