esakal | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : भ्रष्टाचाराचे (corruption) आरोप असलेले माजी गृहमंत्री अनील देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai high court) आजही दिलासा (relief) मिळाला नाही. त्यांनी केलेल्या याचिकेवर (petition) खंडपीठाकडे सुनावणी घेण्याचे निर्देश आज न्यायालयाने दिले.

हेही वाचा: वसई: बाप्पासोबत साडेपाच तोळ्याचा सोन्याच्या मूकूटाचे विसर्जन,पण...

ईडिने देशमुख यांना बजावलेल्या समन्सविरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर एकल न्या. संदीप शिंदे यांच्या पुढे नुकतीच सुनावणी झाली होती. मात्र ही सुनावणी दोन सदस्य असलेल्या न्यायमूर्तींपुढे सुनावणी व्हायला हवी, असे ईडिच्या वतीने अतिरिक्त सौलिसिटर जनरल अनील सिंह यांनी युक्तिवाद केला होता. आतापर्यंत ईडिने केलेल्या कारवाई विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे.

त्यामुळे देशमुख यांनी याचिका देखील खंडपीठाला वर्ग करावी, असे सिंह यांनी सांगितले. देशमुख यांच्या वतीने एड अनिकेत निकम यांनी याला विरोध केला होता. आज न्या शिंदे यांनी यावर निर्णय दिला आणि याचिका खंडपीठाला वर्ग करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता नव्याने याचिकेवर सुनावणी होईल. पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार आरोप केले आहेत. यावर सीबीआय आणि चांदीवाल आयोगाने चौकशी सुरू केली आहे. ईडिने बजावलेल्या समन्स ला देशमुख यांनी उत्तर दिले नाही.

loading image
go to top