'इतके वर्षे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री असून शरद पवार यांना पायलट सुद्धा सुरक्षेसाठी नव्हता'; अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

तुषार सोनवणे
Sunday, 10 January 2021

ठाकरे सरकारकडून राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कपात तर काहींची वाढवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुंबई -  ठाकरे सरकारकडून राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कपात तर काहींची वाढवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याही सुरक्षेत कपात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षेत कपात कण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर विरोधकांनी टीका सुरू केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले त्यावेळी ते म्हणाले की, ''राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रात अनेक वर्ष मंत्री होते. राज्यात अनेकवेळा मुख्यमंत्री होते. इतके वरिष्ठ नेते असताना त्यांना भाजप सत्तेत असताना एकसुद्धा पायलट आणि एस्कॉर्ट नव्हता, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यांच्यासाठी साधा हवालदार सुद्धा सुरक्षेसाठी नव्हता''.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार कोणत्या नेत्याला कोणत्या प्रकारची सुरक्षा द्यायला पाहिजे याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या बाबतीत कोणता पक्ष आहे हे पाहिलं गेलं नाही. खरं तर आज शरद पवार यांचा फोन आला. आणि त्यांनी माझी सुरक्षा कमी करण्यात यावी अशी सूचना केली. कोणाला किती सुरक्षा द्यावी हे त्यांना असलेल्या धोक्यावरून ठरवलं जातं. असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

anil deshmukhHome Minister Anil Deshmukhs reaction after security cuts of BJP and MNS leaders

 

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil deshmukhHome Minister Anil Deshmukhs reaction after security cuts of BJP and MNS leaders