अनिल परब यांना तातडीने लिलावतीमध्ये हलवलं, मुख्यमंत्र्यांनी रद्द केली मातोश्रीवरील बैठक

सुमित बागुल
Tuesday, 13 October 2020

अनिल परब यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. 

मुंबई : एकीकडे अनलॉक आणि दुसरीकडे न कमी होणारा कोरोना. महाराष्ट्रात कोरोना अजूनही थैमान घालतोय. अशात ज्याप्रकारे सर्वसामान्य कोरोनच्या कचाट्यात अडकताना पाहायला मिळतायत त्याचप्रमाणे विविध पक्षांचे नेते आणि मंत्रीही कोरोनाग्रस्त होतायत. यादरम्यान आज महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलंय. कोरोनाची लक्षणं आढळून आल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अनिल परब यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

आज सकाळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांना लिलावतीमध्ये हलवण्यात आलं. आपली कामं कोरोना परिस्थितीत पूर्णपणे काळजी घेऊन अनिल परब निभावत होते. कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घेऊन भेटीगाठी देखील घेत होते. मात्र सकाळी कोरोनाची जास्त लक्षणं आढळल्याने त्यांना लिलावतीमध्ये शिफ्ट केलं गेलंय. मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.

महत्त्वाची बातमी मेट्रो 3 मार्गाच्या भुयारीकरणाच्या कामासाठी 10 हजार स्फोट

आजची बैठक रद्द : 

खरंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं खासगी निवास्थान म्हणजेच मातोश्री बंगल्यावर सर्व शिवसेना आमदारांची बैठक बोलवली होती. मात्र महत्त्वाचे शिवसेना नेते आणि पारेवाहन मंत्री अनिल परब यांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याने आज पार पडणारी बैठक रद्द करण्यात आलेली आहे.

दरम्यान अनिल परब यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. 

anil parab admitted to lilavati hospital due to covid symptoms cm cancelled meeting


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil parab admitted to lilavati hospital due to covid symptoms cm cancelled meeting