अनिल परब यांनी केली फडणवीसांच्या आकडेवारीची पोलखोल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकरानं राज्याला किती पैशांची मदत केली याबाबतची सविस्तर मांडणी केली. या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी केंद्र सरकारसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: लॉकडाऊन संपल्यानंतर सरकार काय उपाययोजना करणार यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत भाजपनं केलेल्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलं आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकरानं राज्याला किती पैशांची मदत केली याबाबतची सविस्तर मांडणी केली. या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी केंद्र सरकारसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसंच परब यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

हेही वाचा: विमान तिकिटांसाठी त्या मजुरानं विकल्या शेळ्या, पुढे झालं असं की... 

महाविकास आघाडीचं सरकार कोणताच आभास निर्माण करत नसून वस्तुस्थिती मांडण्यासाठी समोर आलो असल्याचं परब यांनी सुरुवातीला म्हटलं. तसंच आम्हाला कोणत्या सल्लागाराची गरज नसल्याचं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला हाणला आहे. देवेंद्र फडवीसांना काल आभासी चित्र निर्माण केल्याचं त्यांनी म्हटलं. 122 कोटींचा निधी स्थलांतरित मजुरांसाठीचा निधीही मिळाला नसल्याचा खुलासा परब यांनी पत्रकार परिषदेत केला. 1 हजार 750 कोटींची गहू राज्याला मिळाला नसून केंद्रानं राज्याला वेगळी कुठलीही मदत केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मजुरांसाठीच्या ट्रेनचे पैसे राज्यानं खर्च केलेत. राज्याला श्रमिक ट्रेन मिळत नाहीत, असं परब यांनी म्हणत पियूष गोयल यांच्यावर टीका केली आहे. रेल्वेमंत्री फक्त  ट्विटरवरुन घोषणा करत होते, असं म्हणत परब यांनी गोयल यांच्यावरही निशाणा साधला आहे. केंद्रानं नाही तर राज्य सरकारनं सर्व श्रमिक ट्रेनचा खर्च केला. त्यामुळे एका ट्रेनला 50 लाखांचा खर्च कसा येतो? हे भाजपनं सांगावं असा सवालही परब यांनी उपस्थित केला आहे. 

महाराष्ट्राला केंद्रानं जीएसटीचे हक्काचे पैसे दिले नाहीत. 42 हजार कोटींचा निधी केंद्राकडे थकीत असल्याचीही धक्कादायक माहिती परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हेही वाचा:लॉकडाउन कधी संपेन माहित नाही पण, आलीया भट्ट हा चित्रपट करणार पुर्ण

अनिल परब यांचे केंद्र सरकारवर आरोप 

परवापासून ट्रेनच्या वेळापत्रकातून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. रेल्वे गाड्यांचं कोणतीही नियोजन नसल्यानं स्टेशनवर गर्दी होत असल्याचा आरोप परब यांनी भाजपवर केला आहे. वेगळा कुठलाही निधी केंद्र सरकारनं दिला नसून केंद्रातून येणाऱ्या साहित्याचे पैसे केंद्र सरकारला द्यायचे आहेत. सुरुवातीला सर्व खर्च करु असं केंद्रानं सांगितलं होतं, असंही परब यांनी म्हटलं आहे. 1611 कोटी हे आपत्ती निधीच्या कोट्यातून दिले असल्याचीही माहिती परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

विरोधक सहकार्याऐवजी गोंधळ निर्माण करत असून कर्ज घेण्याचे सल्ले आम्हाला देऊ नये, असा टोला अनिल परब यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

anil parab gave numbers against devendra fadanvis read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil parab gave numbers against devendra fadanvis read full story