
राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेला मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.
मुंबई - ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेला मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिले आहे.
अर्णब गोस्वामीला का अटक करण्यात आलीये; पाहा व्हिडीओ
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अनिल परब म्हटले की, 2018 मध्ये नाईक यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचा तपास न्यायालयाच्या आदेशानेच पुढे सुरू झाला आहे. या तपासात पोलिसांना ज्या ज्या गोष्टी समोर आलेल्या आढळतील. त्यानुसारच कारवाई होत राहील. ही कारवाई कुठल्याही आकसाने होत नसून ती कायदेशीर आहे.
अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेली अटक, ही वृत्तपत्र वृत्तवाहिनी आणि अभिव्यक्तीची गळचेपी असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. यावर अनिल परब म्हटले की, 'एका मराठी उद्योजकाच्या आत्महत्येप्रकरणी दोषी असलेल्याला शिक्षा मिळायला हवी, एका मराठी बहिणीचे कुंकू पुसणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. विरोधकांकडून जो आरडा ओऱडा केला जातोय की वृत्तवाहिन्यांची गळचेपी केली जातेय, ते साफ चुक आहे. या प्रकरणाशी त्याचा संबध नाही.
कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
एका मराठी उद्योजकाचे पैसे अर्णबने थकवले, त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची ही केस आहे. त्यांच्या पत्नीने याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती. त्यावर तत्कालीन सरकारने काही कारवाई केली नाही. शेवटी नाईक यांच्या पत्नीने न्यायालायाचा दरवाजा ठोठावला. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे.
याप्रकरणी भाजपनेते अशा प्रकारे ओरडत आहेत, की जसे काही अर्णब त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. पोलिस पुराव्यानुसार योग्य ती कारवाई करतील.' असेही अनिल परब यावेळी म्हणाले.