'मातोश्री'वर आलेल्या दुबईच्या कॉल बाबत अनिल परब यांचे स्पष्टीकरण; वाचा काय म्हटले?

तुषार सोनवणे
Sunday, 6 September 2020

मंत्री आणि शिवसेना जेष्ठ नेते अनिल परब यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे

मुंबई - मुंख्यमंत्र्यांच्या निवासस्थान म्हणजेच मातोश्रीवर दाऊदच्या हस्तकाने कॉल करून धमकी दिल्याची चर्चा सुरू होती. मात्र मंत्री आणि शिवसेना जेष्ठ नेते अनिल परब यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे

रिया चक्रवर्ती म्हणतेय मी अटकेसाठी तयार; रिया निरपराध आहे, वकिलांचे पुनरुच्चार 

मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी निनावी कॉल आला होता. तो कुख्यात गुंड आणि गॅगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचे म्हटले. या कॉल दरम्यान त्याने मातोश्री उडवून टाकण्याची धमकी दिलेली नाही, असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. परंतु संबधित कॉल बाबत पोलिस गांभीर्याने तपास करीत आहेत.

मुंबईची लोकल 1 नोव्हेंबरपासून सुरू होणे शक्य? 'या' संस्थेने दिला महत्वपुर्ण अहवाल

या कॉल नंतर मुख्यमंत्री आणि मातोश्रीची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. उद्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्याअनुषंगानेही मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढण्यात आली आहे, मुंबईचे नवनियुक्त सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मातोश्रीवर आलेल्या कॉल संदर्भात माहिती घेतली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Parabs explanation about Dubais call on Matoshri; Read what said