मुनगंटीवार, राजीनामा द्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

मुंबई -  "अवनी' या वाघिणीची हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 11) देशभरात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क येथे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात प्राणिप्रेमींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. 

मुंबई -  "अवनी' या वाघिणीची हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 11) देशभरात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क येथे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात प्राणिप्रेमींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. 

अवनी या वाघिणीला वाचवण्यात वन विभाग अपयशी ठरला. त्या मोहिमेत मार्गदर्शक तत्त्वे (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसेजर) पाळली गेली नाहीत. त्यामुळे वनमंत्री मुनगंटीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अभिनेत्री व प्राणिप्रेमी रुपाली गांगुली यांनी केली. अवनीला ठार मारल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून वनमंत्र्यांनी पद सोडावे, अशी मागणी डॉ. सरिता सुब्रमण्यम यांनी केली. 

या मोर्चात आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन आणि मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम सहभागी झाले होते. वाघांच्या संरक्षणात वनमंत्री अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. जंगल वाचवा; जंगलांची जमीन व्यापाऱ्यांच्या घशात घालू नका, अशा घोषणाही मोर्चकऱ्यांनी दिल्या. 

"बछड्यांनाही मारण्याची व्यूहरचना' 
अवनीचे बछडे अद्याप सापडलेले नाहीत; त्यांना शोधण्यासाठी वन विभागाने हालचाल केल्याचे दिसत नाही. हे बछडेही भुकेने व्याकूळ होऊन मृत्युमुखी पडतील. त्यांना मारण्यासाठीच वन विभाग ही व्यूहरचना करत आहे, असा आरोप डॉ. सुब्रमण्यम यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Animal lovers demand Mungantiwar give resignation