अंजली दमानियांना अश्‍लील फोन 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 एप्रिल 2018

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अश्‍लील फोन येत आहेत. रेल्वे तसेच सार्वजनिक ठिकाणी पत्रक चिकटवून त्यावर आपला मोबाईल क्रमांक जाहीर केल्याचा आरोपही दमानियांनी ट्विटरवरून केला आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून ओंगळवाण्या माणसांकडून मला नको त्या वेळी फोन येत आहेत. या व्यक्ती जळगाव, भुसावळ, सुरत, गोरखपूरमधील आहेत. नुकताच मला भुसावळला जाणाऱ्या पॅसेंजरमधून फोन आला. ही ट्रेन आता चाळीसगावला आहे असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे.

ट्विटमध्ये जोडलेल्या फोटोमध्ये एक पत्रक दिसत आहे. "अंजली से खट्टी मिठी बाते करो, फ्री फ्री फ्री' असे लिहून त्यापुढे दमानिया यांचा मोबाईल क्रमांक लिहिण्यात आला आहे.

Web Title: Anjali Damania complaints about Vulgar calls