Mumbai News : अण्णा भाऊ साठे यांच्या २१ पुस्तकांचे भाषांतर पूर्ण; लवकरच होणार प्रकाशन

अण्णा भाऊ साठे याच्या विविध कादंबऱ्या आणि इतर साहित्यात प्रकारातील २१ पुस्तकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतर करून ते ग्रंथ पूर्ण केले आहेत.
Anna bhau Sathe
Anna bhau Sathe Sakal

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राने मागील काही महिन्यांच्या कालावधील अण्णा भाऊ साठे याच्या विविध कादंबऱ्या आणि इतर साहित्यात प्रकारातील २१ पुस्तकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतर करून ते ग्रंथ पूर्ण केले आहेत. या भाषांतरीत ग्रंथांचे लवकरच प्रकाशन केले जाणार असल्याची माहिती आज विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत देण्यात आली.

सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम यांनी कटमोशनच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राला विद्यापीठाच्या मागील अर्थसंकल्पात केवळ २० लाखांची तरतूद करण्यात आली होती. आजच्या अर्थसंकल्पात नेमकी किती तरतूद करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करून या अध्यासनाच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती आणि इतर संशोधनासंदर्भात उपक्रम राबविण्याची मागणी करून त्यासाठी किमान १ कोटी रूपयांची तरतूद करण्याची मागणी केली होती.

त्यावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी या अध्यासनात अनेक चांगले उपक्रम सुरू असल्याची माहिती दिली. तसेच यावर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी अधिकची माहिती देत या अध्यासनाने सुरू केलेल्या भाषांतरीत पुस्तकाच्या उपक्रमाची सरकारनेही कौतुक केल्याचे सांगितले.

डॉ. गायकवाड पुढे म्हणाले, मुंबई विद्यापीठात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राची स्थापना २०२० मध्ये झाली. मागील वर्षी या अध्यासनाला २० लाख रूपयांची तरतूद विद्यापीठाने केली होती. २१ पुस्तकांचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. यात १५ पुस्तके इंग्रजीत आणि इतर भाषांमध्ये करण्यात आले आहे. तर फकिरा या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर करून ती जगभर पोहोचविण्याचे कार्य आपणच केले असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली.

भाषांतर करण्यात आलेल्या २१ पुस्तकांचे लवकरच प्रकाशन केले जाणार असून यासाठी सरकारच्या यंत्रणेसह मुंबई विद्यापीठ आणि दिल्लीतील एनबीटी येथून ते प्रकाशित करण्याचा पर्याय तपासला जाणार असून ज्या ठिकाणी लवकर प्रकाशित करून मिळतील त्याला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती डॉ. गायकवाड यांनी या बैठकीत दिली.

ही आहेत पुस्तके

इंग्रजीतील भाषांतर होणाऱ्या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने चित्रा, नवती, आवडी, कुरूप, माकडीचा माळ, केवड्याचे कणीस, अग्निदिव्य, आघात, रूपा, चिखलातील कमळ, तारा, ठासलेल्या बंदुका, संघर्ष, गुलाम, वारणेचा वाघ, सापळा निळूमांग, रक्ताचा टिळा, मरिआईचा गाडा, डोळे मोडीत राधा चाले या कादंबऱ्यांचा समावेश आहे.

पोवाड्यांमध्ये माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची, लोकमंत्र्यांचा दौरा, चंदन, वैजयंता, वारणेच्या खोऱ्यात ही सर्व पुस्तके इंग्रजीत भाषांतरीत झाली आहेत. तर हिंदीत भाषांतर झालेल्या पुस्तकांमध्ये चित्रा, माझा रशियाचा प्रवास, अग्निदिव्य या पुसतकांचा समावेश आहे. तर फकिरा ही इंग्रजीनंतर तामिळ भाषेत भाषांतर झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com