Sanjay Raut : धमकी प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक; आरोपी आमदार सुनील राऊतांचा निकटवर्ती?

Two accused arrested in Sanjay Raut threat case mumbai crime police
Two accused arrested in Sanjay Raut threat case mumbai crime policesakal

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना धमकी प्रकरणी मयुर शिंदे नावाच्या आरोपीला बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यासंबंधीत माहितीनुसार, मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचा निकटवर्तीय आहे. त्याने संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी त्यांना धमकावण्याचा बनाव रचला होता.

Two accused arrested in Sanjay Raut threat case mumbai crime police
Crime : 12वी पास आरोपीचा सायबर फ्रॉड करुन कोट्यावधींचा गंडा; आर.एल. स्टीलची फसवणूक

मयूर शिंदेंनी स्वतः फोन केला नाही. पण तोच या कट कारस्थानामागील मुख्य सूत्र असल्याचा दावा केला जात आहे. त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राऊतांना धमकीचे फोन केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांची कारवाई

मयूर शिंदेला अटक करण्यापूर्वी या पूर्वी रिझवान , शहीद अन्सारी या दोघांना गोवांडीतून अटक करण्यात आली. पुढे पोलिसांकडून आकाश पटेल, मुन्ना शेख या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीनंतर मयूर शिंदे पर्यंत पोलीस पोहोचले.

आरोपी मयुर शिंदेने स्वत: धमकीचे फोन कॉल केले नाहीत. मात्र मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सूत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. मयूर शिंदे हा आमदार सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असून संजय राऊतांच्याही तो जवळचा असल्याची माहिती उघड झाली. सुरक्षेत वाढ व्हावी यासाठी हा बनाव रचल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Two accused arrested in Sanjay Raut threat case mumbai crime police
KCR : नगरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार! 'या' बड्या नेत्याला घेऊन 'बीआरएस'ची आगेकूच

घटनाक्रम

शुक्रवारी 9 जून रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी आली. 'सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा दोघांना जीवे मारू, या महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू” अशी धमकी देण्यात आल्याचे सुनील राऊत यांनी माध्यमांशी सांगितले आहे.

“गुरुवारी 8 जून रोजी 4 च्या दरम्यान मला तीन ते चार फोन आले. त्याने मला आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली.” असेही सुनील राऊत यांनी सांगितले.यापूर्वीही संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com