भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता! आमदार गीता जैन शिवसेनेच्या वाटेवर

तुषार सोनवणे
Friday, 23 October 2020

मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई - माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रवेशानंतर राजकिय चर्चांना उधान आले आहे. खडसे यांच्यानंतर भाजप समर्थक मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

155 द.ल.लि. पाणी कागदावरच! मिरा-भाईंदर पालिकेकडे अपुरी यंत्रणा असल्याचा आरोप

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपमधील नाराज नेतेही पक्षांतर करू शकतात अशा चर्चांना वेग आलेला असताना आता मीरा भाईंदरमधील अपक्ष आमदार गीता जैन शनिवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गीता जैन मीरा भाईंदरच्या माजी महापौर आणि भाजपनेत्या आहेत. परंतु गत विधानसभा निवडणूकीत गीता यांचे विरोधक मानले जाणाऱ्या नरेंद्र मेहता यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. नरेंद्र मेहता हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे गीता यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यांनी मेहतांचा पराभव केला. 

अमेरिकेच्या टेस्ला कंपनीसाठी लाल गालिचा; उद्योगमंत्री, पर्यावरणमंत्र्यांची वेबिनारद्वारे चर्चा

निवडणूकांच्या निकाला नंतर भाजपला पूर्ण बहुमत नसल्याने, गीता यांना भाजपला समर्थन देण्याचा आग्रह धरण्यात आला. गीता यांनी भाजपला समर्थन दिलेही. परंतु याच दरम्यान त्यांना शिवसेनेनेही समर्थन देण्याविषयी आवाहन केल्याची माहिती आहे. आता राज्यातील राजकिय गणितं बदलली आहेत. त्यामुळे गीता जैन शिवसेनेत प्रवेश करणाऱ असल्याची शक्यता आहे.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another blow to BJP Mira Bhayanders MLA Geeta Jain on the way to Shiv Sena